पहूर येथे कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवरविशेष रूग्ण तपासणी मोहिम

    दिनांक : 11-Jul-2020
Total Views |

corona_1  H x W
३५ नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने दाखविली तयारी
पहूर ता. जामनेर: जिल्ह्यात कोरोना रूग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून पहूर येथे सुध्दा कोरोना बाधीतांच्या संख्येत वाढ होत आहे.पहूर कोरोनाचे हॉटस्पॉट झाले असून कोरोना रूग्णांची संख्या ४४ वर पोहोचली आहे .कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रूग्णालय पहूर यांच्या संयुक्त विद्यमाने वाढत्या कोरोना रूग्ण संख्येला प्रतिबंध घालण्यासाठी विशेष तपासणी व समुपदेशन मोहीम हाती घेण्यात आली.
 
ज्या भागामध्ये कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत व त्याठिकाणी संसर्ग जास्त असण्याची शक्यता आहे , अशा परिसरात घरोघरी भेटी देवून तपासणी करण्यात आली. कोरोनाची भिती दूर होण्याच्या दृष्टीने समुपदेशन करण्यात आले. विशेष म्हणजे या मोहिमेत ३५ व्यक्तींनी स्वयंस्फुर्तीने स्वॅब तपासणीसाठी तयारी दर्शविली.त्यासाठी नाव नोंदणी केली. ग्रामीण रूग्णालयात सर्व नोंदणीधारकांचे स्वॅब घेण्यात येऊन जळगावला तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. विशेष तपासणी मोहीम राबविण्यासाठी सरपंच निताताई पाटील, ग्रा.पं. सदस्य व पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले. यासाठी वाकोद प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.संदिप पाटील, पहूर ग्रामीण रूग्णालयाचे डॉ. जितेंद्र वानखेडे , डॉ.संदिप कुमावत यांच्यासह आरोग्य कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.