जिल्हाधिकारी उतरले रस्त्यावर

    दिनांक : 11-Jul-2020
Total Views |
 मनपाच्या रुग्णशोध मोहीमेची केली पाहणी, अनेकांकडून कौतुक

collector_1  H  
 
जळगाव, ११ जुलै
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरात १३ जुलैपर्यंत जिल्हाधिकार्‍यांनी लॉकडाऊन घोषित केले आहे. याकाळात शहरात मनपातर्फे स्थानिक संस्था व संघटनांसोबत रुग्णशोध मोहीम सुरु आहे. या मोहीमेत कार्य आणि माहिती घेण्यासाठी शनिवारी सकाळी चक्क जिल्हाधिकारी अभिजित राऊत नागरिकांच्या दारी पोचले होते. यावेळी अनेकांनी जिल्हाधिकार्‍यांचे कौतुक केले.
 
 
जिल्हाधिकार्‍यांनी गेल्या महिन्यात पदभार स्वीकारला असून युवा असल्याने थेट रस्त्यावर उतरून ते कामाला लागले आहे. सुरुवातीस काही दिवसातच त्यांनी जिल्हा कोविड रुग्णालयात चक्क रात्री, मध्यरात्री पाच वेळा भेट देऊन, कारभाराची पाहणी केली. जनता ‘लॉकडाऊन’ काळात रस्त्यावरून उतरून नागरिकांना हटकले, पोलिसांना विचारणा केली. आता महापालिकेच्या सर्वेक्षण मोहिमेत महापालिकेचे कर्मचारी, स्वयंसेवक काय तपासणी करतात ? त्यांना नागरिक प्रतिसाद कसा मिळतो हे पाहण्यासाठी सकाळी गिरणा टाकी परिसरातील नवीन पोस्टल कॉलनी परिसरात जिल्हाधिकार्‍यांनी पाहणी केली. सर्वेक्षण पथकासोबत जिल्हाधिकारीही सहभागी झाले होते.
 
 
रुग्णशोध मोहिमेअंतर्गत घरोघरी जाऊन प्रामुख्याने तापमापक यंत्राने ताप मोजणे, ऑक्सिमिटरच्या साहाय्याने ऑक्सिजन पातळी, पल्स रेट मोजणे, तसेच इतर आजार (मधुमेह, क्षयरोग, हृदयरोग)याची नोंद केली जात आहे.
 
 
दररोज १०० घरांचे सर्वेक्षण
एका टीम मध्ये एक महापालिका शिक्षक व दोन स्वयंसेवक असे तीन जण आहेत. या प्रमाणे शहरातील ५० भागांत १०० व राष्ट्रीय स्वयंसेवक सर्वेक्षण करीत आहेत. प्रत्येक टीम रोज १०० घरांचे सर्वेक्षण करणार आहे. स्वयंसेवकांच्या सुरक्षेसाठी त्यांना पीपीई कीट, फेसशील्ड, मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझर उपलब्ध करून दिले आहे.