पिलखोडला नागरीकाच्या सर्तकतेमुळेगुरे चोरणारी अट्टल टोळी पोलिसांच्या ताब्यात

    दिनांक : 10-Jul-2020
Total Views |

mehunbare_1  H
मेहुणबारे पोलिसांची कामगिरी, गायीसह इंडिगो जप्त ,
शेतकर्‍यांकडून कठोर कारवाईची मागणी
मेहुणबारे, ता. चाळीसगाव : चाळीसगाव तालुुक्यात गेल्या चार ते पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांच्या गुरांची चोरी झाली आहे. चाळीसगाव तालुक्यातून जामदा येथून गुरे चोरून नेत असतांना पिलखोड ग्रामस्थांच्या मदतीने मेहुणबारे पोलिसांनी शेतकर्‍यांची गुरे चोरून नेणार्‍या अट्टल टोळीला रंगेहात पकडण्यात मेहुणबारे पोलिसांना यश आले आहे.
 
चाळीसगाव तालुक्यात येवून गायी व बैले चोरणार्‍या मालेगाव, धुळे येथील सहा जणांची टोळी मेहूणबारे पोलीसांच्या हाती लागली. पोलीसांनी सहाही जणांना जेरबंद केले असून त्यांच्याकडून गायी वाहून नेणारी इंडिगो व दोन गायी ताब्यात घेतल्या आहेत. संशयित चोरट्यांनी गायी जामदा (ता. चाळीसगाव) शिवारातून पाचपुते यांच्या शेतामधून चोरून नेल्याचेही उघडकीस आले आहे. या टोळी विरोधात मेहूणबारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिलखोड (ता. चाळीसगाव) येथील दुध व्यावसायीक भैय्या पांडुरंग पाटील सकाळी साडेचार वाजता शेतात दुध घेण्यासाठी जात असतांना मालेगाव रस्त्यावर पिलखोडजवळ एका शेतात इंडिगो कार (एमएच. २०, आरसी ७७५३) पंक्चर काढतांना चार जण आढळून आले. त्यांनी त्यांची चौकशी केली असता, त्यांचा संशय बळावला. त्यांना शंका आल्यानंतर त्यांनी गाडीत पाहिले असता, त्यात गांयी कोंबलेल्या आढळून आल्या. भैय्या पाटील यांना शंका आल्याने गाडीत पहिले असता दोन गायी कोंबलेल्या दिसून आल्या. पाटील यांनी आपले मित्र तसेच पोलीस पाटलांना आणि मेहूणबारे पोलीसांना याबाबत सांगितले. त्यानंतर मेहुणबारे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे यांना माहिती मिळाल्यावर त्यांनी तात्काळ हवालदार रमेश पाटील, कमलेश राजपूत, अन्वर तडवी यांना घटनास्थळी पाठविले. पिलखोड ग्रामस्थांच्या मदतीने पोलीसांनी आतिक उर्फ रहेमान महंमद सलीम, महंमद शहा हरूण शहा व मैफुजर रहेमान महंमद हरूण तिघे धुळे, रहेमान शहा हारूण शहा (रा. मालेगाव) यांना रंगेहात गुरे नेतांना पकडण्यात आले. त्यापैकी दोघे जण उसाच्या शेतातून पळून जात असतांना ग्रमस्थांनी त्यांना पकडून त्यांना प्रसाद दिला. त्यांचे दोन साथीदार शेख जलील शेख खलील व शेख सुलतान शेख अब्दुल रज्जाक दोन्ही (रा. मालेगाव ) हे (एमएच.४१ झेड.९८४५) या पल्सर मोटारसायकलने मालेगावकडे पळून गेले. त्यांना साकुर फाटा चेक पोस्टवर ड्युटीवर असलेले पोलिसांना दूरध्वनीवरून कळविल्यानंतर दोघांना पोलिसांनी अटक केली.
 वर्षांपासून गुरे चोरणारी टोळीची सक्रीयता
गेल्या चार ते पाच वर्षांपासून चाळीसगाव तालुक्यात गुरे चोरीच्या मोठ्या प्रमाणात घटना घडल्या आहे. काही शेतकर्‍यांनी तक्रार दिली आहे तर काहींनी तक्ररीच दिल्या नाहीत. त्यात बैलजोडी चोरीचे प्रमाण जास्त आहे. जामदा येथील दोन गायी कारमध्ये कोंबून नेणारे सहा जणांची टोळी पोलीसांच्या हाती लागल्याने यापूर्वी तालुक्यात चोरीस गेलेल्या पशुधनाचा तपास लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.