बांबरुड राणीचे येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

    दिनांक : 10-Jul-2020
Total Views |
 
 
2400 रुपये, जुगाराच्या साहित्यासह चौघे ताब्यात
 
 
पाचोरा : पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांना बांबरुड (राणीचे) गावी जुगार खेळला जात असल्याबाबत माहिती मिळाली. त्यांची तत्काळ दखल घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील ,सहा. फौजदार रामदास चौधरी, पो.कॉ. सुनील पाटील, पो.कॉ. योगेश पाटील, समीर पाटील, सचिन पाटील यांनी दुपारच्या सुमारास बांबरुड (राणीचे) गावी जाऊन तंटामुक्त कार्यालय समोर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली.
 
 

Jugar_1  H x W: 
 
 
या धाडीत पोलिसांनी पंढरीनाथ सोनवणे, रवींद्र जगताप, आसिफ मेवाती, जंगी चव्हाण या चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 2400 रुपये व जुगाराचे साहीत्य जप्त करण्यात आले आहे याबाबत पोलीस कॉन्स्टेबल किरण पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध मुंबई जुगार अ‍ॅक्ट कायदा कलम12(अ)नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार रामदास चौधरी करीत आहे.