आरोग्य सेवेचा चोपडा पॅटर्न मार्गदर्शक : प्रांताधिकारी अहिरे

    दिनांक : 10-Jul-2020
Total Views |
 
 
चोपडा :  ‘चोपडा कोरोनामुक्त अभियान’ या व्हॉट्सअप ग्रुप च्या माध्यमातून सुरू झालेल्या लोकसहभागाच्या चळवळीतून एक आदर्श असे काम उभे राहिले आहे. यातून निर्माण झालेला ’आरोग्यसेवेचा चोपडा पॅटर्न’ जिल्हाभर तसेच राज्यभर मार्गदर्शक ठरत आहे. शासनाच्या प्रयत्नांना यामुळे भक्कम अशी साथ लाभली आहे, असे प्रतिपादन अमळनेर उपविभागाच्या प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी केले.
 
 
Chopda_Seema Ahire_1 
 
चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोवीड केअर सेंटरमध्ये प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार अनिल गावीत यांच्या उपस्थितीत आरोग्यसेवेचा चोपडा पॅटर्न अंतर्गत ऑक्सिजन पाईप लाईन, 2 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, मोबाईल एक्स रे मशीन, इन्व्हर्टर, 4 वॉटर प्युरिफायर, 20 पंखे असे अंदाजे 5 लाख तीस हजार रुपये किमतीचे साहित्य कोविड सेंटरचे प्रमुख तथा वैद्यकीय अधीक्षक डॉ.मनोज पाटील, डॉ गुरुप्रसाद वाघ, डॉ.पंकज पाटील व टीमकडे एस.बी. पाटील व सहकार्‍यांनी सुपूर्द केले.
याप्रसंगी अभियंता सी.एस.पाटील, रमाकांत सोनवणे, मयुर शिंदे, शेख आरिफ, भुर्‍या जहागीरदार, विपीन बोरोले, कुलदीप पाटील, पत्रकार संजय बारी, आर.डी.पाटील, सुरेश चावरे यावेळी उपस्थित होते.