अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेतर्फे रोग प्रतिकारक शक्ती औषधाचे वाटप

    दिनांक : 10-Jul-2020
Total Views |
 
 
 
नंदुरबार :  राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. सुरुवातीला उच्चभ्रू वस्तीमध्ये आढळलेल्या कोरोनाने आता झोपडपट्ट्यांमध्ये धिरकाव केला आहे. अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेतर्फे नंदुरबार न.पा.तील सफाई कर्मचार्‍यांना रोग प्रतिकारक शक्ती औषधाचे वाटप करण्यात आले.
 
 

NBR_Safai_1  H  
 
सफाई कामगार हा अहोरात्र बेधडकपणे शहराची साफसफाई करुन शहर स्वच्छ व सुंदर ठेवत असतो. अशातच कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव सुरु असताना सुद्धा सफाई कर्मचारी सकाळी 4 वाजेपासून ते सुर्यास्तापर्यंत आपल्या कुटूंबियांचा जीव धोक्यात घालून काम करीत असतो. शहरवासियांकडून त्यांचे कौतुकही होते. परंतू अद्यापही त्यांना पुरेसे साहित्य व सुविधा उपलब्ध होत नसल्याने त्यांचेही आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या स्वच्छगृहिंच्या सुरक्षिततेसाठी अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष नागेज कंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्हाध्यक्ष कुंदन थनवार यांनी 7 जुलै रोजी शहरातील संपूर्ण सफाई कर्मचार्‍यांना रोग प्रतिकारक शक्ती वाढविणार्‍या औषधाचे वाटप केले. या कार्यक्रमाप्रसंगी शासनाच्या नियमानुसार सोशल डिस्टन्सचे पालन करण्यात आले. हा उपक्रम अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेतर्फे राज्यातील 30 जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. नंदुरबार येथील औषध वाटप कार्यक्रमाप्रसंगी अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी दिनेश टाक, सुदीश कडोसे, राजू भिडे, राजेश तेजी, बबलेज तेजी, नंदुजी बैसाणे, शरण जाधव, हेमंत जाधव, रवि कोळी, स्वास्थ्य निरीक्षक रवी काटे, मतीन सैय्यद, शशि थनवार, कंत्राटदार भारत आदी उपस्थित होते.