वढोदा-सावदा रस्त्याच्या दुरुस्तीला प्रारंभ, ग्रामस्थांमध्ये समाधान

    दिनांक : 10-Jul-2020
Total Views |
 
 
फैजपूर, ता.यावल : येथून जवळच असलेल्या पिंपरुड ता. यावल येथील पिंपरुडवरून वढोदा, मांगी, करंजी जाण्यासाठी डांबरी रस्ता खड्डामय झाला आहे. तो दुरुस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी मान्य करत प्रशासनाने बुधवारी रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली.
 
 
Faizpur_Vadhoda Road_1&nb
 
 
पिंपरुडमार्गे वढोदा, मांगी, करंजी या लहान गावी जाण्यासाठी डांबरी रस्ता होता. पिंपरुड - वढोदा या रस्त्यावर ठिकठिकाणी महाकाय खड्डे पडले आहेत. खड्यात पावसाचे पाणी साचत होते. तसेच या रस्त्यावरून दिवसा रात्री जाणे-येणे म्हणजे जीवाची एक सर्कसच आहे. या रस्त्यावरून शेतकरी, ग्रामीण भागातील नागरिक, फैजपूर, सावदा, आमोदाकडे जाण्यासाठी नियमित ये-जा करतात. या रस्ताची दखल प्रशासनने तात्काळ घेतली. बुधवारी जेसीपी मशीन पाठवून कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना या रस्ता दुरुस्ती मुळे त्रास होणार नाही. वढोदा येथे महामंडलेश्वर सतपंथ रत्न जनार्दन हरीजी महाराज यांचे ’निष्कलंकी धाम’ या आश्रमाचे काम सुरु असून याठिकाणी शांती निकेतन शाळा आहे. याठिकाणी महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात या भागातून भाविक भक्तगण निष्कलंकी धामला येतात. रस्ता दुरुस्तीमुळे ग्रामस्थांनी आभार मानले.