कोविड सेंटरसाठी आ. किशोर पाटील यांनी आरोग्य विभागास दिले 25 कॉट

    दिनांक : 10-Jul-2020
Total Views |
 
 
पाचोरा, भडगाव मतदारसंघातील दानशूराना रुग्णांच्या सेवेसाठी मदतीचे आवाहन
 
 
पाचोरा : पाचोरा-भडगाव मतदारसंघात कोरोना बांधीताची संख्या कमी जास्त प्रमाणात वाढत आहे. कोरोना बांधीत रूग्णांना उपचारासाठी बेड व कॉट कमी पडू नये म्हणून आ. किशोर पाटील यांनी आरोग्य विभागास 25 बेड व 25 कॉटसह रूग्णांशी संवाद साधण्याकरीता सांऊड सिस्टीम सेट स्वाधीन केला.
 
 
Pachora_25_Cot_1 &nb
 
9 जुलै रोजी आ. किशोर पाटील यांनी प्रांताधिकारी यांचे दालनात आयोजीत बैठकीत आवाहन केले की पाचोरा - भडगांव मतदार संघात कोरोना बाधीत रूग्ण संख्या कमी अधिक प्रमाणात आढळून येत असले तरी मतदारसंघासाठी अभिमानाची बाब अशी की आज पावेतो पाचोरा तालुक्यात एकुण 121 कोरोना बाधीत रूग्ण संख्या आढळून आली. त्यापैकी 87 रूग्णांनी पूर्ण पणे कोरोनावर मात करून बरे होवून घरी परतले. 9 रूग्ण दगावले आहेत. 25 रूग्ण उपचार घेत आहेत. कोविड सेंटरमध्ये रूग्णांची हेडसांड होवू नये याकरिता 25 कॉट व 25 बेड व सांऊड सिस्टीम आ. पाटील यांनी आरोग्य विभागाकडे दिले. तसेच पाचोरा - भडगाव मतदार संघातील दानशूर दात्यांनी कोरोना बांधीत रूग्ण सेवेसाठी कॉट व बेड देण्याचे आवाहन केले. तसेच कोविड सेंटरवर कोरोना रॅपीड टेस्ट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून कोरोना बाधीत रूग्णांचा टेस्ट घेतल्यानंतर 20 मिनीटात अहवाल प्राप्त होण्यास मदत मिळणार आहे. पूर्वी रूग्णांना टेस्ट देवून दोन ते तिन दिवस क्वारंटाईन राहावे लागत होते. आता रॅपिड टेस्टने लवकरच अहवाल प्राप्त होईल असे आ. किशोर पाटील यांनी आयोजीत बैठकीत माहिती दिली. बैठकीनंतर आ. किशोर पाटील यांनी पाचोरा ग्रामीण रूग्णालयात जाऊन रूग्णांसाठी ऑक्सीजन सुविधेची पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ, वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित साळुंखे , तलाठी आर.डी. पाटील , स्वियसहाय्यक राजेश पाटील आदी उपस्थित होते.