मोयगाव येथील 6, पहूरला 1 कोरोनाबाधित

    दिनांक : 10-Jul-2020
Total Views |
 
 
पहूर ता.जामनेर : जामनेर तालुक्यातील मोयगाव येथील 6 जणांना तर पहूरपेठ येथील एका व्यक्तीस कोरोनाची बाधा झाली असल्याची माहिती पहूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तथा नोडल अधिकारी डॉ. हर्षल चांदा यांनी दिली.
 
 
corona_1  H x W
 
जामनेर तालुक्यातील मोयगाव येथील 5 पुरुष आणि 1 महिला अशा 6 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच पहूर पेठ येथील मेनरोडवर राहणार्‍या 58 वर्षीय शेतकर्‍याचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. पहूर येथील बाधीतांची संख्या 36 झाली आहे. कोरोना संक्रमणाची साखळी तुटावी यासाठी उद्यापासून 11 ते 15पर्यंत पाच दिवसांच्या जनता कर्फ्यूचे आयोजन करण्यात आले आहे. उद्यापासून होणार्‍या बंदच्या पार्श्वभूमीवर मात्र आज बसस्थानक परिसरात नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. नागरिकांनी शासकीय नियमांचे पालन करण्याचे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. ग्रामस्थांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.