जिल्ह्यात आढळले १६९ नवे रुग्ण

    दिनांक : 10-Jul-2020
Total Views |
जळगाव शहरात ७३ कोरोनाबाधित

corona_1  H x W 
 
जळगाव, १० जुलै
जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा झपाट्याने वाढत असून शुक्रवारी १६९ नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले. त्यात सर्वाधिक ७३ रुग्ण जळगाव शहरातील असून ग्रामीणमध्ये १६ आणि भुसावळ व चोपडा तालुक्यात प्रत्येकी १३ रूग्णांचा समावेश आहे.
 
 
जिल्हा माहिती कार्यालयानुसार, शुक्रवारी दिवसभरात जिल्ह्यात एकूण १६९ कोरोनाबाधित रूग्ण आढळले. त्यात सर्वाधिक ७३ रूग्ण हे जळगाव शहरातील आहेत. तसेच जळगाव ग्रामीण १६, भुसावळ १३, अमळनेर ९, चोपडा १३, पाचोरा ४, भडगाव ४, धरणगाव ६, यावल ७, एरंडोल १, जामनेर १०, रावेर ८, चाळीसगाव ४ बोदवड १ रुग्ण आहे.
 
 
दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यात एकूण कोरोना बाधितांचा आकडा ५ हजार ४७१ इतका झाला आहे. त्यातील ३ हजार २२३ रूग्ण बरे झाले आहेत. सध्या कोविड केअर सेंटरमध्ये १ हजार ९३३ रूग्ण उपचार घेत आहेत. तर शुक्रवारी जिल्ह्यात एकूण ६ रूग्णांचा मृत्यू झाला असून आजवर कोरोनामुळे मृत झालेल्यांची संख्या ३१५ झाली आहे.
 
१४४ रुग्ण झाले कोरोनामुक्त
दरम्यान, एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे दिलादायक बाब म्हणजे दररोज रुग्ण बरे होण्याची संख्या अधिक आहे. त्यातच शुक्रवारी दिवसभरात एकूण १४४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आता कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ३ हजार २२३ पर्यंत पोहचली आहे.
 
 
जिल्ह्यातील जळगाव, भुसावळ व अमळनेरात सध्या सक्तीचा लॉकडाऊन सुरू आहे. यात जळगावमध्ये दिवसेंदिवस रूग्ण संख्या वाढत चालली असून यामुळे प्रशासनाची चिंता वाढलेली आहे.