विद्यार्थ्यांचा एटीकेटीचा प्रश्न जैसे थे

    दिनांक : 01-Jul-2020
Total Views |
 
 
तीन लाख विद्यार्थी संभ्रमात; दहा दिवसात निर्णय नाहीच
 
 
धुळे : राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा ऐच्छिक ठेवण्याचा निर्णय घेवून दहा दिवस उलटलेले असले तरी अद्याप एटीकेटीच्या बाबत सरकारने कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. परीणामी राज्यभरातील १० लाख विद्यार्थ्यांपैकी जवळपास ३ लाख विद्यार्थ्यांच्या डोक्यावर या निर्णयाबाबतची टांगती तलवार आहे.
 
 

Tushar Jadhav_1 &nbs 
 
 
राज्यभरातील विविध विद्यापीठांच्या महाविद्यालयिन अंतिम वर्षाच्या घ्यायच्या की, नाही यावर बरेचसे नाट्य राज्य सरकार आणि राज्यपालांच्या पवित्र्यामुळेज घडले. अखेरीस सरकारने व्यावसायिक अभ्यासक्रम वगळता अन्य अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच ज्यांना परीक्षा द्यायची ईच्छा असेल त्यांच्यासाठी हा निर्णय ऐच्छिक ठेवण्यात आला. परंतु अद्याप ही अंतिम वर्षात असेलेल्या विद्यार्थ्यांच्या एटीकेटीबाबत सरकारमार्फत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे अंतिम वर्षाची परीक्षा नसली तरी या बँकलॉंकच्या विषयांचे काय करायचे? अशा संभ्रामात हे विद्यार्थी आहेत. एटीकेटीच्या समस्या दुर झाल्याविना या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण तसेच नोकरीसाठी अर्जही करता येणार नसल्याने परीक्षा न देण्याचा निर्णय घेणारे विद्यार्थी टेन्शनमध्ये आहेत.
 
 
एटीकेटीच्या विद्यार्थ्यांबाबत विद्यापीठांचे कुलगुरू तसेच संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याने १९ जूनच्या अध्यादेशामध्ये राज्यसरकार मार्फत जाहीर करण्यात आले होते. परंतु अद्याप याबाबत कोणत्याही सूचना विद्यार्थ्यांना मिळालेली नाही. राज्यभरातील विद्यापीठांमध्ये अव्यावसायिक अभ्यासक्रमांचे ७ लाख ३० हजार तर व्यावसायिक अभ्यासक्रमांचे २ लाख ८० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
 
 
 
केवळ अंतिम वर्षाची परीक्षाच नव्हे तर एटीकेटी असलेल्या विद्यार्थ्यांची समस्याही सरकारने लक्षात घ्यायला हवी परीक्षेसोबत याचाही निर्णय सरकारने घेणे आवश्यक होते. परीक्षा ऐच्छिक करण्याचा निर्णय घेवून दहा दिवस उलटले तरी एटीकेटी असलेल्या विद्यार्थ्यांबाबत मात्र कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. हा निर्णय जोवर होत नाही तोवर या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रश्न सुटणार नाही आम्ही याचा सातत्याने पाठपुरावा करीत आहोत.
- तुषार जाधव अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य समाजकार्य समन्वय समिती,नाशिक