हिरे रुग्णालयाच्या डॉक्टरांसह १२ कर्मचार्‍यांना कोरोनाची बाधा

    दिनांक : 01-Jul-2020
Total Views |
 
 

Corona_1  H x W 
 
 
धुळे : जिल्ह्यात कोरोनाच्या नवीन रुग्णसंख्येचा आकडा दिवसागणिक वाढतोच आहे. मंगळवारी ६० नवीन रुग्ण समोर आले. यात हिरे रुग्णालयातील सहा डॉक्टर, चार टेक्निशियन आणि दोन कर्मचार्‍यांचा समावेश आहे. नव्या रुग्णांमध्ये शहरातील चाळीसगाव रोड, मोहंमदीनगर, महसूल कॉलनी, बालाजीनगर, नकाणेरोड, दौलतनगर, अमोलनगर, श्रीरामनगर, जय गजानन कॉलनी, समतानगर, प्रभा कॉलनी, मोगलाई, वैभवनगर, वलवाडी, लोकरेनगर, झेड.पी. कॉलनी, विमलनाथनगर, साईदर्शन कॉलनी, गौरीशंकर कॉलनी आदी भागातील आहे. याशिवाय शिरपूर, साक्री व पिंपळनेरलाही दोन रुग्ण सापडले. बाधितांची संख्या ११२२ वर पोहोचली. नंदुरबार् जिल्ह्यात मंगळवारी नवीन रुग्ण नाही ही दिलासादायक बाब असून, एका ७७ वर्षीय आजीबाईंनी कोरोनावर मात केली. त्यांच्यासोबत एका ५६ वर्षीय पुरुषाला घरी सोडण्यात आले. आतापर्यंत ७४ जण बरे झाले.