चाळीसगावातील महावीर कृषी केंद्रावर छापा

    दिनांक : 08-Jun-2020
Total Views |

पाच लाखांचे बनावट रासायनिक खत जप्त
चाळीसगाव : येथील महावीर कृषी केंद्रांवर ८ जून रोजी नाशिकच्या कृषी विभागाने छापा टाकून पाच लाखाचे बनावट रासायनिक खत जप्त केले आहे.
 
चाळीसगाव शहरातील घाट रोड परिसरातील रमेश अर्जुन पाटील, भिकन अर्जुन पाटील यांच्या मालकीच्या असलेल्या महावीर कृषी केंद्राचे संचालक व मालक शैलेंद्र छाजेड यांनी भाड्याने घेतलेल्या गोडाऊनमध्ये रासायनिक खताच्या बनावट पाचशे बॅगा (१८:१० नावाच्या पोती) सातारा येथील बंद पडलेल्या कंपनीचे नावे वापरून गुजरात (भरूच)येथून ट्रकमधून एम.एच.१८,७३२४ ने आणून चढ्या भावाने शेतकर्‍यांना १०५० रुपये किमतीला विकण्याचा डाव होता. मात्र बनावट रासायनिक खताचा साठा छापा टाकून जप्त करण्यात आला. पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशीरापर्यंत कारवाई करण्याचे काम सुरू होते. 
 
 
नाशिक विभागीय गुण नियंत्रण गुण निरीक्षक अधिकारी उल्हास ठाकूर, जिल्हा गुण निंयंत्रण निरीक्षक निरीक्षक अरूण तायडे,
तालुक्याचे गुणनियंत्रण निरीक्षक अधिकारी सी.डी.साठे, तालुक्याचे तालुका गुणनियंत्रण समितीचे सदस्य एस.एन.भालेराव, कृषी विभाग पथकाने घाट रोडवरील दोन गोडाऊन मालक, महावीर कृषी केंद्राचे संचालक शैलेंश छाजेड सातारा कंपनी व गुजरात भरूच ट्रकवर असलेले दोन चालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.