फैजपूरला अजून दोघे संक्रमित

    दिनांक : 08-Jun-2020
Total Views |
 
शहरात ७ रुग्ण, ७ प्रतिबंधात्मक क्षेत्र
 

Faizpur Corona_1 &nb 
फैजपूर ता.यावल : शहरात पुन्हा एक कोरोना संक्रमित झाला आहे. शहरात सात रुग्ण नव्याने आढळले असून सात प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून जाहिर करण्यात आली आहेत.
 
 
शहरात दक्षिण बाहेरपेठ- आठवडे बाजारपेठ, कुरेशी मोहल्ला, नम्रता नगर- शिवाजीनगर ,राजबाग - यावल रोड, मिल्लतनगर ,खुशालभाऊ रोड हे भाग कोरोना प्रतिबंधात्मक करण्यात आले आहे. प्रतीबंधात्मक क्षेत्रमध्ये वाढ होत असल्याने या परिसरातील व्यापारी, जनसामान्य नागरिक यांची मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे.
 
 
शहरातील कुरेशी मोहल्ला भागातील एका डॉक्टर व्यवसायिकाची पत्नी व खुशाल भाऊ रोडभागातील एक दुकानदार सुद्धा कोविड संक्रमित झाल्याचे निदर्शनास आले आहे. प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले व मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने मिल्लत नगर व खुशाल भाऊ रोड भाग २८ दिवसासाठी सील केला आहे. परिसर हा निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात येत आहे. फैजपुर शहरात आतापर्यंत एकूण ९ कोविड - १९ चे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी दक्षिण बाहरपेठ भागातील २ महिला रुग्ण बरे होऊन घरी सुखरूप पोहचले आहेत, तर उर्वरीत ७ जण संक्रमित रुग्ण कारखाना परिसरातील फैजपूर कोविड १९ सेंटरमध्ये उपचार घेत आहे. तसेच फैजपूर हायस्कूलमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये ३० नागरिक संशयित म्हणून दाखल आहेत.
 
 
फैजपूर पोलीस ठाण्यातील उर्वरित १९ कोरोना योद्धा पोलीस बांधवांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. कारखाना परिसरातील फैजपूर सेंटरमध्ये एकूण तीनशेच्यावर संशयित कोरोना रुग्ण भरती करण्यात आले. त्यापैकी काही रुग्ण बरे झाल्याने व काहींचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने २५५ नागरिक घरी परतले आहे. उर्वरित ४५ संशयित रुग्ण उपचारार्थ सध्यास्थितीत सेंटरमध्ये दाखल आहे. त्यापैकी कोरोनाचे २२ संक्रमित रुग्ण उपचार घेत आहेत. सर्वांची प्रकृती सुधारणा होत असून ते लवकरच घरी परततील असे फैजपूर मंडळाधिकारी जे.डी.बंगाळे व मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी सांगितले.