चोपड्यात एका कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू, कडकडीत बंद

    दिनांक : 08-Jun-2020
Total Views |
 
corona_1  H x W
 
चोपडा : येथील प्राप्त ३० अहवालात २८ निगेटिव्ह तर दोन पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात पोलिस लाईन एक, शिंदे वाडा एक,आणि नाशिक खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेले मेन रोड भागातील एका रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. चोपडा तालुक्यातील कोरोना बाधीतांची संख्या ७२ झाली आहे. एकूण ५६ अहवाल अप्राप्त आहेत.
 
 
चोपडा येथील पटवे अळी भागातील नाशिक येथील खाजगी दवाखान्यात उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित ४५ वर्षीय महिलेचा सकाळी मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदीप लासूरकर यांनी दिली.
 
 
पाच दिवसांचा जनता कर्फ्यू
दरम्यान चोपडा शहरात कोव्हीड १९ ची साखळी तोडण्यासाठी जाहिर करण्यात आलेला आजपासूनचा पाच दिवसाचा जनता कर्फ्यू नागरिकांनी व व्यापार्‍यांनी कडकडीत स्वरूपात पाळला. बाजारपेठत व शहरातील मुख्य रस्त्यावर शुकशुकाट दिसून आला.