केंद्र सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपा महानगरतर्फे परिपत्रक वाटप

    दिनांक : 08-Jun-2020
Total Views |
 
MLA Bhole_1  H  
जळगाव, ७ जून
केंद्र सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपा जिल्हा महानगरतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परिपत्रक वाटपाचा शुभारंभ शनिवारी आ.सुरेश भोळे यांच्या उपस्थित करण्यात आला.
 
सरकारच्या कार्यकाळातील प्रथम वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामाबद्दलचे जनतेला पंतप्रधानांचे पत्रक महानगरतर्फे ९ मंडलात वाटप करण्यात आले. तर मंडल क्र. ६ रामानंद नगर येथून आ.सुरेश भोळे, जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या हस्ते पत्रक वाटपास सुरुवात झाली.
 
याप्रसंगी मंडलाध्यक्ष अजित राणे, जिल्हा पदाधिकारी राधेश्याम चौधरी, महेश जोशी, उज्ज्वला बेडाळे, शरीफा तडवी, निला चौधरी, वंदना पाटील, प्रा.जीवन अत्तरदे, राहुल वाघ, मनोज भांडारकर, नगरसेवक प्रा.सचिन पाटील, ज्योती राणे, मंडल पदाधिकारी अक्षय चौधरी, लक्ष्मण धनगर, रेखा पाटील, बंटी नेरपगार, अमित शिंदे आदी उपस्थित होते. तसेज महानगरातील अन्य मंडलातही हे पत्रक सोशल डिस्टन्सिंग ठेवून वाटप करण्यात आले.
 
शिवाजीनगरात वृक्षारोपण
दरम्यान, शिवाजीनगर मंडल क्र.१ यांच्यातर्फे रविवारी सकाळी परिसरात मराठी शाळेमध्ये प्रदेशाकडून आलेल्या कार्यक्रमांतर्गत मोदी सरकारच्या दुसर्‍या टर्ममधील भाजपा पक्षातर्फे मोदी सरकारने राबवलेल्या कार्यक्रमाचे अहवालाचे माहिती पत्रक देण्यात आले. त्या कार्यक्रमांतर्गत वृक्षारोपणसुद्धा करण्यात आले. याप्रसंगी पदाधिकारी राजू मराठे, चिटणीस नगरसेवक मंडलाध्यक्ष रमेश जोगी, नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांच्यासह प्रसिद्धीप्रमुख संजय शिंदे, महिला आघाडीच्या ज्योती राजपूत, सरचिटणीस शांताराम गावंडे, युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश पुरोहित, प्रभाकर तायडे, अरूण भोई, संजय सोनवणे, बाळा पाटील, राजू मांढरे, उत्तम शिंदे, अशोक हकिम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.