लॉकडाऊनचे उल्लंघन करणार्‍या १६ दुकानदारांवर गुन्हा

    दिनांक : 08-Jun-2020
Total Views |

crrime pic_1  H
जळगाव, ७ जून
लॉकडाऊन काळात ठरवून दिलेल्या वेळेच्या नंतर व आधीच दुकान, खानावळ व मटन हॉटेल उघडे ठेवणार्‍या १६ जणांवर एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आले आहे.
 
 
लॉकडाऊनच्या काळात शिथिलत ठेवत जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी वेळेचे नियोजन करून दुकानदारांना उघडण्याची मुभा दिली आहे. दिलेला वेळ संपूनही दुकान, मटन हॉटेल, खानावळ सुरू ठेवणार्‍या १६ जणांवर एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यात सुतीम पाटील (तांदलवाडी) यांचे भुसावळ रोडवरील केकबाईट नावाची बेकरी, रणजीत जैन (रा, हनुमान नगर, मेहरुण) यांचे आनंद किराणा दुकान, मनोज गावीत (रा. साक्रि धुळे) यांचे गोदावरी कॉलेज समोरील नुपूर हॉटेल, गिरीश धनगर (रा. कासमवाडी) यांचे नारखेडे मटन हॉटेल, राजकुमार पाटील (रा.मेस्को माता नगर) यांचे नारखेडे मटन हॉटेल, मतीन अहमद पटेल (रा. सुप्रीम कॉलनी) यांचे किराणा दुकान, देविदास पाटील (रा. सुप्रीम कॉलनी) यांचे किराणा दुकान, अनीस खान सुलतान खान (रा. सुप्रीम कॉलनी) यांचे किराणा दुकान, बजीर गुरुमुख राठोड (रा. सुप्रीम कॉलनी) यांचे किराणा दुकान, देवराम भंगाळे (रा. मेहरुण जळगाव) यांचे किराणा दुकान, नामदेव वसंत वंजारी (रा. मेहरुण) यांचे किराणा दुकान, नितीन सुकदेव सोनवणे (रा. रामेश्‍वर कॉलनी) यांचे किराणा दुकान, आशीष सीगवीरा (अयोध्यानगर) यांचे किराणा दुकान, फरीदा बानो मोहम्मद रईस (मेहरुण) यांचे मन्नत किराणा दुकान, सुनील राधामोरे (रा. रामेश्वर कॉलनी) यांचे किराणा दुकान, अकिल कय्युब खाटीक (मेहरुण) यांचे मच्छिशॉपचे दुकान यांच्यावर भादंवि कलम १८८, २६९ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
 
 
पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, दादासाहेब वाघ, सचिन पाटील, योगेश बारी, माजी सैनिक रवींद्र बाविस्कर यांनी ही कारवाई केली.