डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ५०० बेड

    दिनांक : 08-Jun-2020
Total Views |
सिव्हिल आता शाहू महाराज रुग्णालय



dr patil hosplital_1  
 
जळगाव, ८ जून
जिल्हा प्रशासनाने साकेगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कोविड डेडीकेटेड हॉस्पिटल म्हणून घोषित करून अधिग्रहीत करण्यात आले आहे. या रुग्णालयात तातडीने ५०० बेडची व्यवस्था करण्यात आली. पूर्वी या ठिकाणी हलवलेले सिव्हिल आता येथून जळगावच्या शाहू महाराज रुग्णालयात कार्यान्वीत करण्यात आले. सिव्हीलमध्ये जे रुग्ण यायचे त्यांना आता जिल्हाभरातील ३३ हॉस्पिटलमध्ये शासकीय उपचार मोफत मिळणार आहेत.
 
 
साकेगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड हॉस्पिटलमध्ये भुसावळ, रावेर, यावल, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर व जळगाव ग्रामिण येथील कोविड-१९ बाधित व संशयित रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत. तसेच जिल्ह्यातील जळगावात शाहू महाराज रुग्णालय, ऑर्किड हॉस्पिटल, डॉ. भंगाळे सर्जिकल अँड नर्सिंग होम, गायत्री हॉस्पिटल, श्री शैलेजा ऍक्सिटेंड हॉस्पिटल, जावळे हॉस्पिटल, अश्विनी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, डॉ. महाजन हॉस्पिटल, डॉ. खडके हॉस्पिटल, संजीवन हार्ट हॉस्पिटल, प्रकाश चिल्ड्रेन हॉस्पिटल, कांताई नेत्रालय, जीवनज्योती कॅन्सर हॉस्पिटल, भुसावळ पुष्पा सर्जिकल हॉस्पिटल, डॉ. भिरूड हॉस्पिटल, साईपुष्प ऍक्सिटेंड हॉस्पिटल, विश्वनाथ हॉस्पिटल, जामनेर कमल हॉस्पिटल, जीएम हेल्थ केअर हॉस्पिटल, चोपडा नृसिंह हॉस्पिटल, पाचोरा विघ्नहर्ता हॉस्पिटल, चाळीसगाव बापजी जीवनदीप हॉस्पिटल, सौ. शैलेजा मेमोरियल कृष्णा केअर सेंटर, अमळनेर येथील श्री ऍक्सिटेंड हॉस्पिटल, वरणगाव धन्वंतरी हॉस्पिटल याशिवाय मुक्ताईनगर,जामनेर, चोपडा, पहूर ग्रामीण रुग्णालयात शासकीय उपचार मिळणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.