चिनावलला ७० वर्षानंतर भाजपाची एकहाती सत्ता

    दिनांक : 08-Jun-2020
Total Views |
 
उपसरपंचपदी परेश महाजन विजयी


Chinaval GP Election_1&nb
फैजपूर ता.यावल : उपसरपंच निवडणुकीत भाजपप्रणीत नम्रता पॅनलचे परेश मुकुंदा महाजन हे निवडून आलेले असून सभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच भावना योगेश बोरोले या होत्या. ग्रामसेवक खैरनार यांनी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून कामकाज पाहिले.
 
 
चिनावल ग्रामपंचायतीचे उपसरपंच शेख यांनी राजीनामा दिल्याने रिक्त असलेल्या जागेसाठी येथील ग्रामपंचायत कार्यालयावर झालेल्या उपसरपंच निवडीच्या बैठकीत उपसरपंचपदासाठी परेश मुकुंद महाजन, तबस्सुम शेख अजमल व संदीप सुरेश टोके यांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज माघारवेळी संदीप टोके यांनी माघार घेतल्याने परेश महाजन व तबस्सुम शेख यांच्यात सरळ लढत होऊन परेश महाजन यांना १० मते तर तबस्सुम यांना ९ मते मिळाली. परेश महाजन हे चिनावलच्या उपसरपंचपदी निवडून आले.
 
चिनावल ग्रामपंचायतीच्या इतिहासात प्रथमच बिगर कॉंग्रेसी सरपंच उपसरपंच निवडलेले आहे.उपसरपंच हे पद ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून कॉंग्रेसप्रणीत पॅनलकडे होते. भाजपने परेश महाजन यांच्या रूपाने संपुर्ण ग्रामपंचायत आपल्याकडे खेचून आणली आहे. निवडीवेळी सरपंच भावना बोरोले यांचेसह सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.यावेळी ग्रामपंचायतीच्या कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले. भाजप जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे, माजी मंत्री एकनाथराव खडसे, आ.गिरीश महाजन, खा.रक्षाताई खडसेसह भाजप पॅनल प्रमुख बाजार समिती संचालक गोपाळ नेमाडे ,माजी सरपंच योगेश बोरोले यांच्यासह कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित उपसरपंच परेश महाजन यांचे अभिनंदन केले.