भडगावच्या ९४ वर्षांच्या आजीची कोरोनावर मात

    दिनांक : 07-Jun-2020
Total Views |

Bhadgaon Corona Discharge
 
 
पाचोरा : रविवारी भडगाव तालुक्यातील पाच रुग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत भडगाव तालुक्यातून डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण ७१ आहेत, ६ रुग्ण जळगाव येथे उपचार घेत असून ३ रुग्णांचा यापूर्वी मृत्यू झालेला आहे. रविवारी डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांमध्ये भडगाव येथील ९४ वर्षांच्या आजींचा देखील समावेश आहे. ९४ वर्षांच्या आजीची कारोनावर मात केल्याने परिसरात तो चर्चेचा विषय झाला आहे.