राष्ट्रवादी काँग्रेस, गुलाबराव देवकर फाउंडेशन आणिमजूर फेडरेशनतर्फे 10 जूनला महारक्तदान शिबीर

    दिनांक : 07-Jun-2020
Total Views |
 
अजित पवारांनी घेतली गुलाबराव देवकर फाऊंडेशन, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपक्रमांची दखल
 
 
 
 

blood camp_1  H
 
जळगाव :  
 येथील राष्ट्रवादी काँग्रेस, गुलाबराव देवकर फाउंडेशन आणि मजूर फेडरेशन यांच्या माध्यमातून समाजातील गरजू बांधवांसाठी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सध्या कोरोनाचा वाढता प्रभाव आणि लागण लक्षात घेता शिवाय रुग्णांची वाढती संख्या व रक्ताची कमतरता पाहता वरील तीनही संघटनांतर्फे येत्या बुधवार, 10 जून रोजी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे उपचाराचा गंभीर प्रश्न सोडवण्यास मदत होणार आहे. काहीठिकाणी रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याने यासंदर्भात माजीमंत्री गुलाबराव देवकर यांनी महारक्तदान शिबिरासंदर्भात रा.काँ. चे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली. अजितदादांनी सर्व उपक्रमाची माहिती घेत या उपक्रमाचे कौतुक करून सोशल डिस्टन्सिंगबाबत मार्गदर्शन व सूचनाही केल्या. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने रक्तदानासारखा महत्त्वाचा उपक्रम जळगावसोबतच संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त राबविण्याचे आवाहनही केले.
 
 
जळगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस, गुलाबराव देवकर फाऊंडेशन व मजूर फेडरेशनतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाचा योग साधून आता 6 ऐवजी 10 जून रोजी सकाळी 9 वाजता आकाशवाणी चौकाजवळील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात भव्य प्रमाणावरील महा रक्तदान शिबीर घेण्यात येणार आहे. सर्वांनी मोठ्या संख्येने प्रत्यक्ष रक्तदान करून रुग्णांचा जीव वाचवण्याच्या या उपक्रमात सहभागी होऊन कोरोनाविरुद्ध सुरू असलेल्या लढ्यात आपले योगदान द्यावे. कोरोनविरुद्ध लढतांना राष्ट्रवादी काँग्रेस, गुलाबराव देवकर फाउंडेशन आणि मजूर फेडरेशनने समाजसेवेचे अनोखे उदाहरण सगळ्या समाजापुढे उभं केलं आहे. या तिन्ही संस्थांच्या माध्यमातून ’मोफत अन्नछत्र’ गेल्या दोन महिन्यापासून अव्याहतपणे सुरू होते. 2 महिन्यात सुमारे 3 लाख लोकांची भूक भागवण्यात आली आहे . हे काम लॉकडाऊन संपेपर्यंत सुरू होते. सर्व कार्यकर्त्यांनी अत्यंत परिश्रम घेत भीषण उन्हात दररोज तीन हजार लोकांना जेवण पुरवले . आता शासकीय रुग्णालयाला रक्त पुरवठा करून लोकांचे जीव वाचवायचे आहेत . त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करून या कोरोनाविरुद्ध सुरू असलेल्या लढ्यात आपले योगदान द्यावे असे आवाहन गुलाबराव देवकर यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
 
 
उन्हात काम करणार्‍या पोलीस बांधवांना गारवा मिळावा म्हणून शहरात 25 ठिकाणी तंबू उभारून त्यांची या तिन्ही संस्थांनी सोया केली आहे . गेल्या दोन महिन्यांपासून अन्नछत्र व पोलीस बांधवांना सावलीसाठी तंबू हे काम सुरू होतेच . आता रक्तदान करून राष्ट्रवादी काँग्रेस , गुलाबराव देवकर फाउंडेशन आणि मजूर फेडरेशनने समाजसेवेचे आणखी एक उदाहरण सर्व समाजापुढे उभे केले आहे . 10 जून रोजी सकाळी 9 वाजता आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात होणार्‍या या महारक्तदान शिबिरात अधिकाधिक जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन गुलाबराव देवकर फाउंडेशनचे विश्वस्त विशाल देवकर, अध्यक्ष लीलाधर तायडे आणि कार्याध्यक्ष पुरुषोत्तम चौधरी (आबा) यांनी केले आहे.