बोदवड तालुक्यात कोरोनाचा शिरकाव

    दिनांक : 07-Jun-2020
Total Views |

Bodwad Corona_1 &nbs
 
 
बोदवड : शहरातील मुळ रहिवाशी असलेल्या एका ७३ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने बोदवडमध्ये खळबळ उडाली आहे.
 
 
जिल्ह्यात कोरोनाने एक हजाराचा आकडा पार केलेला आहे. भुसावळ, मुक्ताईनगर, जामनेर, मलकापूर, अश्या आजूबाजूच्या चारही तालूक्यात कोरोनाचा शिरकाव झालेला असला तरी कोरोनामुक्त तालूका म्हणून बोदवडची ओळख कायम होती. परंतू, शहरातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामूळे खळबळ उडाली आहे. शहरातील रेणुका माता मंदिर परिसरात राहणार्‍या एका ७३ वर्षीय महिलेवर जळगाव येथे गेल्या पाच दिवसांपासून रक्तदाबाच्या त्रासाकामी उपचार सुरु आहे. उपचार सुरु असतांना कोरोना संदर्भात लक्षणे दिसत असल्याने कोविडची टेस्ट करत त्यांचे १२ जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. सकाळी अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याने प्रशासनाची धावपळ उडाली. त्यामुळे रेणूका माता मंदिर परिसर सील करण्यात आला आहे. संबंधित महिला बोदवड शहरातील रहिवाशी असून त्यांच्यावर काही दिवसांपासून जळगाव येथे उपचार सुरु आहे. रेणूका माता मंदिराजवळील भाग प्रभाग क्रमांक ६ प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमिवर अत्यावश्यक सेवा देणार्‍या आस्थापनांशी समन्वय म्हणून नगरपंचायतीकडून कर्मचार्‍यांची नियूक्ती करण्यात आली आहे. नोडल अधिकारी म्हणून नगरपंचायतीकडून सहाय्यक कार्यालयीन अधिक्षक राजूसिंग चव्हाण यांची नियूक्ती करण्यात आली आहे.