चाळीसगावात दोघे कोरोना पॉझिटीव्ह

    दिनांक : 07-Jun-2020
Total Views |
 

coraona virus_1 &nbs
 
 
गेल्या चार दिवसांपूर्वी हनुमानवाडीतील तरुणाचे व करगाव रोडवरील ३५ वर्षीय महिलेची चाचणी घेण्यात आली होती. रविवारी अहवाल प्राप्त झाले असून हे दोघे पॉझिटिव्ह आढळून आल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.देवराम लांडे यांनी सांगितले. दोघेही वैद्यकिय सेवा बजावणारे असल्याचे कळते. शहरात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. प्रशासनाकडून नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.