भुसावळातील ११ लाखांच्या घरफोडीतील चोरटे जेरबंद

    दिनांक : 07-Jun-2020
Total Views |

 crime logo_1  H
 
भुसावळ : शहरातील रजानगर येथील एका डॉक्टरासह कुंटूंब क्वारंटाईन असतांना सुमारे ११ लाखांच्या ऐवजावर डल्ला मारणारे चोरटे स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे.
 
 
२४ मे रोजीच दुपारी ३ वाजेनंतर ते १ जून रोजीचे सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान भुसावळ शहरातील खुशतर हाऊस, रजानगर येथे डॉ.सिनिन मशहुद रजा सैय्यद वय ३९ यांच्या राहत्या घरी घरातील सर्व लोक क्वारंटाईन सेंटरमध्ये असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे बेडरूमचे खिडकीचे लोखंडी ग्रिल उचकावून घरात प्रवेश करून १० लाख ९० हजार रू. किंमतीचा ऐवज त्यात ४ लाख रोकड, सोन्याचांदीचे दागिने व इतर वस्तू घरफोडी करून चोरून नेल्याने भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल कऱण्यात आला होता.
 
 
घरफोडीचे अनुषंगाने पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती भाग्यश्री नवटके, उपविभाग पोलिस अधिकारी गजानन राठोड यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम व भुसावळ बाजार पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना मार्गदर्शन केले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. बापु रोहम यांनी स्थानिक गुन्हे शाखे कडील स .फौ. राजेंद्र पाटील , पो.हे.कॉ. . अनिल इंगळे ,पो.हे.कॉ. शरीफ काझी ,रमेश चौधरी , युनूस शेख , संतोष मायकल , रणजित जाधव , पोहेकॉ - राजेंद्र पवार यांना भुसावळ येथे रवाना केले होते. पो.ना .युनूस शेख व रणजित जाधव यांना गोपनीय माहिती मिळाली की, भुसावळ शहरातील काही इसमांनी घरफोडी केली आहे. त्या अनुषंगाने वरील पथकाने आकाश सुरेश मोरे वय - २५ रा . घोडे पी नगर , भुसावळ यास ताब्यात घेतले असता त्याने व त्याचे साथीदार शेख दाऊद शेख महेमूद ,रा . दीनदयाळ नगर , भुसावळ , अनिस शेख रशीद रा . जाम मोहल्ला , भुसावळ ,अल्तमस शेख रशिद रा . जाम मोहल्ला , भुसावळ ,जहीर रा. मुस्लिम कॉलनी , भुसावळ यांनी मिळून घरफोडी केली केल्याचे समोर आले. आकाश मोरे वय - २५ रा . घोडे पीरनगर , भुसावळ याने कबूल केल्याने त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व रोख रुपये २ लाख ८६ हजार ४०० रुपये जप्त केले आहे. आरोपी दाऊद याचे वडील शेख महेबूब शेख इमाम वय ६० रा. दिन दयाळ नगर , भुसावळ याच्याकडून गुन्ह्यातील चोरी गेलेले रोख रुपये ७९ हजार ९०० रुपये जप्त केले.