कासोद्यात दोन गटात हाणामारी

    दिनांक : 06-Jun-2020
Total Views |
दंगलीचा गुन्हा दाखल, शांतता राखण्याचे पोलिसांचे आवाहन
 
 
कासोदा : येथील आठवडे बाजारालगत दोन गटात शुल्लक कारणावरुन हाणामारी होऊन कासोदा पोलिस स्टेशनला दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
सविस्तर वृत्त असे की, तळई रस्त्यालगत असलेल्या शेतातील पंप चालू करण्याकरिता फिर्यादी वाल्मिक देवीदास समशेर व साक्षीदार गणेश आहिरे व अनिल बिजभिरे हे गेले होते. त्यावेळी त्यांच्या शेतातील विहीरीजवळ आरोपी इरफान मुन्साफ खान व त्याचा मित्र अजमल खा, मुक्तार खान हे दारु पित बसले होते. वाल्मिक समशेर त्या दोघांना बोलला की, हे आमचे शेत आहे. तुम्ही येथे दारु का पितात याचा राग येवून इरफानने त्यांना प्रति उत्तर देत तेरेकू क्या करने का है हम इधरही दारु पिनेको बैठेगे असे बोलून वाल्मिक यास धक्काबुक्की करुन शिविगाळ करू लागल्याने भांडण वाढू लागल्यावर वाल्मिक याने भाऊ विलास समशेर, रविंद्र समशेर यांना बोलवून समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र इरफानने विलास यास देखील मारहाण केली. त्यानंतर आम्ही घरी येवून गेलो. मात्र ५ रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास इरफान व अजमल खान याने इम्रान मुन्साफ खान, सलाऊद्दीन, सलाऊद्दीनचा मुलगा, नजमुद्दीनचा मुलगा, सायराबीचा मुलगा, नाजीम याचा मुलगा, याचेसह दहा-पंधरा इसम नाव माहीत नाही असे सर्वजण आमचे घरावर चालून आले.दगडफेक करुन दरवाजे खिडक्यांचे नुकसान केले. त्यावरुन कासोदा पोलिस स्टेशनला त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास स.पो.नि.रविंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि.नरेश ठाकरे व सहा.फौज. सहदेव घुले हे करित असून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच वरील गुन्ह्याविरुद्ध इरफान खान मुन्साफ खान याने दिलेल्या फिर्यादीवरुन वाल्मिक देवीदास समशेर, गणेश बाबुलाल आहिरे, अनिल गोकुळ बिजभिरे, विलास रामचंद्र समशेर व गोविंद बन्सी समशेर यांच्याविरुद्ध भा.दं.वि. कलम १४३,३२३,५०४,१८८ , ३७ (१)(३) चे उल्लंघन केल्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला.
 
 
फिर्यादी व साक्षीदार अजमल मुक्तार खान यांना वरील आरोपी यांनी तुम्ही आमच्या मोकळ्या जागेत शौचास का बसले असे जाब विचारल्यावरुन फिर्यादी व साक्षीदार यांना शिविगाळ व लाठाबुक्क्यांनी मारहाण करुन आरोपी यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठीच्या जिल्हाधिकारी यांचे जमाव बंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक युवराज कोळी करत आहे. घटना स्थळाला चाळीसगावचे उपविभागीय अधिकारी कैलास गावडे यांनी भेट देऊन पोलिस स्टेशनला हिन्दु- मुस्लीम बांधवांची मिटींग घेवून दोन्ही समाजात शांतता व सलोखा ठेवणेबाबत व कोरोनाबाबत मार्गदर्शन केले.