शासनाची बीडीएस प्रणाली सुरु

    दिनांक : 30-Jun-2020
Total Views |
 
 
राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या प्रयत्नाला यश
 
 
नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व शासकीय कर्मचारी यांचे भविष्य निर्वाह निधी प्रस्ताव गेल्या ३ महिन्यांपासून प्रलंबित होतेे. स्वतःची जमा रक्कम कौटूंबिक अडचणीसाठी बीडीएस प्रणालीतील बिघाडमुळे काढता येत नव्हती. यामुळे राज्यातील जिल्हा परिषद शिक्षक आर्थिक अडचणीत सापडले होते. याची दखल घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार व अतिरिक्त मुख्य सचिव, वित्त विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना संघटनेमार्फत २८ मे २०२० रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे संस्थापक अध्यक्ष आ. संजय केळकर, नागपूर विभागाचे शिक्षक आ. नागो गाणार, नाशिक विभागाचे पदवीधर आ.सुधीर तांबे यांच्यामार्फत परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांनी ई-मेल व्दारे लेखी निवेदन पाठविले होते. शासनस्तरावर याचा वारंवार पाठपुरावा केल्यानंतर शासनाने बीडीएस प्रणाली सुरू केली असून शिक्षकांची गेल्या तीन महिन्यापासून प्रलंबित भविष्य निर्वाह निधीची प्रकरणे मंजूरीचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती राज्य सहकार्यवाह पुरुषोत्तम काळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.
 
 
परिषदेच्यावतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार अतिरिक्त मुख्य सचिव, वित्त विभाग, महाराष्ट्र राज्य मुंबई, आ. संजय केळकर. आ. नागो गाणार, आ.सुधीर तांबे यांनी सदर प्रकरणी विशेष प्रयत्न केल्याने शिक्षक परिषदेच्यावतीने आभार मानण्यात येत आहेत. यासंदर्भात वर्तमानपत्रातून व सोशल मीडियाच्या माध्यमातून कर्मचारी यांचा आवाज शासन दरबारी पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार्‍या महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांचे या ठिकाणी आभार मानले आहेत. बीडीएस प्रणाली सुरू झालेली असल्यामुळे अनेक महिने प्रलंबित असणार्‍या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांची भविष्य निर्वाह निधी/वैद्यकीय बिले/सेवानिवृती नंतरची बिले प्रस्ताव मंजूर होऊन पैसे मिळणार आहेत. संबंधित कर्मचारी यांना याचा लाभ होणार आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे, कार्याध्यक्ष मधुकर उन्हाळे, बाबुराव पवार, कार्यवाह सुधाकर मस्के, संघटकमंत्री सुरेश दंडवते, राज्य संपर्कप्रमुख रावसाहेब रोहोकळे, पुरुषोत्तम काळे, कोषाध्यक्ष संजय पगार, प्रकाश चतरकर, अविनाश तालापलीवार, मच्छिंद्र गुरमे, प्रकाश चुनारकर, राजेंद्र नांद्रे, मंगेश जैवाळ, बाबुराव गाडेकर, सुनील केणे, संजय निजापकर, भरत मडके, डॉ.सतपाल सोवले, प्रविण ढुबे, विकास गवते, संजय शेळके, महादेव चाटे, श्रीराम बोचरे, डि.एम.पंडागळे, भिका सपकाळे, दिलीप पाटील, विजय साळवे, विलास बोबडे, राजेंद्र शिंगाडे, रमेश गोहील, आबा बच्छाव, अवधूत वानखेडे, निळकंठ गायकवाड, प्रकाश गुरव, प्रशांत वाघमारे, भगवान घरत, शांताराम घुळे, संजय कोठाले, भगवान जायभाय, कृष्णकांत मलिक, उमेश पाटील, शैलेश चौकशे, राजेंद्र चौधरी, रवीकिरण पालवे आदींनी शासनाच्या या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. आज बीडीएस प्रणाली सुरु झाल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या शिक्षक बंधू भगिनींनी याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.