धुळ्यात 25 रुग्णांची कोरोनावर मात

    दिनांक : 28-Jun-2020
Total Views |
 
 
corona_1  H x W
 
धुळे : येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील कोविड केअर सेंटरमध्ये कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहे. याठिकाणी असलेले 25 रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे त्यांना शनिवारी सेंटरमधून सुटी देण्यात आली. यावेळी महापालिकेचे आयुक्त अजिज शेख, स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे, उपायुक्त गणेश गिरी, सहायक आयुक्त शांताराम गोसावी आदी उपस्थित होते. टाळ्या वाजवत, पुष्पवृष्टी करून कोरोनामुक्त झालेल्यांना निरोप देण्यात आला. या वेळी आयुक्त अजिज शेख म्हणाले की, कोरोनाची लागण होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर कोरोनाविषयी जनजागृती करावी असे आवाहन त्यांनी केले.