देशातील कोरोनाबाधितांनी संख्या पाच लाखांवर

    दिनांक : 27-Jun-2020
Total Views |


 १८ हजार ५५२ नवे रुग्ण; ३८४ रुग्णांचा मृत्यू

 

 
नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या रुग्णवाढीने आता वेग धरला असून कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने आता पाच लाखांचा आकडा पार केला आहे. त्यामुळे देशभरात चिंतेचे वातावरण आहे. गेल्या २४ तासात कोरोना रुग्ण संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. देशात पहिल्यांदाच कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १८ हजारांच्या पुढे गेली. देशभरात गेल्या २४ तासात एकूण १८ हजार ५५२ कोरोनाबाधित नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
 
 
 

Corona Update_1 &nbs 

आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाने आज शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात देशात १८ हजार ५५२ कोरोनाबाधित नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लाख हजार ९५३ इतकी झाली आहे. तर गेल्या २४ तासात ३८४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून देशातील एकूण कोरोनाबाधित बळींची संख्या १५ हजार ६८५ इतकी झाली आहे. गेल्या आठ दिवसांपासून १४ ते १५ हजारांनी वाढणारी कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने १८ हजारांचा टप्पा ओलांडल्यामुळे देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

 
समाधानकारक बाब म्हणजे, उपचार घेत असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या आधिक आहे. लाख ९७ हजार ३८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर लाख ९५ हजार ८८१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सुधारून ५७.४३ टक्के झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.