आता घरबसल्या अपडेट करता येणार रेशन कार्ड

    दिनांक : 27-Jun-2020
Total Views |


 
 

नवी दिल्ली : केंद्र सरकारने नुकतीच 'वन नेशन, वन रेशन कार्ड' योजना लागू करण्याची घोषणा केली आहे. रेशन कार्डमध्ये कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या नावाची नोंदणी करायची असल्यास ती आता घरूनच करता येणार आहे. ही नावाची नोंदणी कशी करायची, घरबसल्या रेशन कार्ड कसे अपडेट करायचे हे जाणून घ्या.

 
 

Ration Card_1   
 

रेशन कार्ड अपडेट करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

- रेशन कार्डमध्ये घरातील एखाद्या सदस्याच्या नावाची नोंदणी करायची असल्यास कुटुंब प्रमुखाचे रेशनकार्ड असणे अनिवार्य आहे. याची एक फोटोकॉपी आणि ओरिजिनल कॉपी असावी. तसेच मुलाच्या जन्माचा दाखला आणि आईवडिलांचे आधार कार्ड आवश्यक आहे.

- घरामध्ये लग्न करून आलेल्या सुनेचे रेशन कार्डमध्ये नाव टाकायचे असेल तर तिचे आधार कार्ड आणि पतीच्या रेशन कार्डची फोटोकॉपी आणि ओरिजिनल कॉपी असावी. यासोबतच माहेरच्या रेशन कार्डमधून नाव कमी केल्याचे प्रमाणपत्र देखील असावे.

 

घरबसल्या 'कसे' ऑनलाईन अपडेट करायचे

- घरबसल्या रेशन कार्डमध्ये माहिती अपडेट करण्यासाठी संबंधित राज्याच्या अन्न पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जा. पहिल्या वेळेस वेबसाईटवर लॉगिन आयडी तयार करावा लागेल.

- लॉगिन आयडी तयार केल्यावर वेबसाईटच्या होमपेजवर आपल्या नव्या सदस्याचे नाव टाकण्याचा एक पर्याय असेल, त्यावर क्लिक करा. त्यानंतर एक फॉर्म ओपन होईल.

- ओपन झालेल्या फॉर्ममध्ये कुटुंबातील ज्या सदस्याच्या नावाची नोंदणी करायची आहे, त्याची संपूर्ण माहिती भरा.

- फॉर्मसह आवश्यक डॉक्युमेंट्सची स्कॅन कॉपी अपलोड करा. यानंतर फॉर्म सबमिट करा.

- फॉर्म सबमिट झाल्यावर एक रजिस्ट्रेशन नंबर मिळेल, ज्याच्यामदतीने नंतर फॉर्म ट्रॅक करू शकता.

- फॉर्म आणि डॉक्युमेंट्स अधिकार व्हेरिफाय करतील. जर तुम्ही दिलेली सर्व माहिती योग्य असेल तर फॉर्म ॅसेप्ट करण्यात येईल आणि पोस्टाद्वारे रेशन कार्ड घरच्या पत्त्यावर पाठवण्यात येईल.