भारतात ‘डेक्सामेथासोन’ औषध वापरायला परवानगी

    दिनांक : 27-Jun-2020
Total Views |


 

नवी दिल्ली : देशात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवरडेक्सामेथासोनहे औषध वापरायला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परवानगी दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना व्हायरसच्या उपचारपद्धतीमध्ये काही बदल केले आहेत. मेथाइलप्रेड्निसोलोनला पर्याय म्हणून डेक्सामेथासोन औषध वापरायला परवानगी दिली आहे. कोरोनाची मध्यम आणि गंभीर लक्षणे असलेल्या तसेच ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या रुग्णांवर डेक्सामेथासोन औषधाने उपचार करायला परवानगी देण्यात आली आहे.

 


dexamethasone_1 &nbs 
 
 
 
सर्वप्रथम यूकेमधील संशोधनात डेक्सामेथासोन औषध कोरोनावर प्रभावी ठरत असल्याचे समोर आले. डेक्सामेथासोन हे औषध प्रामुख्याने संधीवात, ॅलर्जी, दमा आणि काही प्रकारच्या कॅन्सरमध्ये उपचारासाठी वापरले जाते. हे औषध कोरोनावर सुद्धा प्रभावी ठरत आहे. डेक्सामेथासोन हे जेनेरिक स्टेरॉइड प्रकारातील औषध आहे. कोरोनामुळे गंभीर अवस्था असलेल्या रुग्णांना हे औषध देण्यात यावे, असा WHO ने सल्ला दिला होता.

 

 
डेक्सामेथासोनचा डोस कमी प्रमाणात देऊन गंभीर अवस्था असलेल्या तीन रुग्णांपैकी एकाचे प्राण वाचवता येतात. संशोधकांनी अभ्यासातून हा निष्कर्ष मांडला आहे. या औषधामुळे मृत्यू दर कमी होत आहे. कोरोनामुळे व्हेंटिलेटर किंवा ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांना डेक्सामेथासोनचा डोस दिल्यानंतर ते रुग्ण बरे होत असल्याचे दिसले आहे. महत्वाचे म्हणजे हे औषध स्वस्तात उपलब्ध होते.