‘मास्क’ला हिंदीत काय म्हणतात?

    दिनांक : 25-Jun-2020
Total Views |
बिग बींनी सांगितलं नाव
 
 
भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे यातून बचावासाठी सध्या सर्वजण मास्क आणि सॅनेटायझरचा वापर मोठ्या प्रमाणात करताना दिसत आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की, मास्कला हिंदीमध्ये काय म्हणतात? माहित नसेल तरी काळजीचं कारण नाही. कारण बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मास्कचं हिंदी भाषांतर शोधून काढलं आहे.
अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते नेहमीच त्यांचे फोटो आणि त्यांच्याशी संबंधत किस्से, मोटिव्हेशनल पोस्ट , वडिलांच्या कवितांच्या ओळी पोस्ट करीत असतात. नुकतीच त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली असून त्यात त्यांनी ‘मास्क’ या शब्दाचा हिंदी अनुवाद सांगितला आहे. यासोबत स्वतःचा एक फोटो सुद्धा शेअर केलाय. ज्यात त्यांनी मास्क घातला असून तोसुध्दा खूप स्पेशल आहे.
 
BIG B _1  H x W
 
 
इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करताना बिग बींनी लिहिलं...सापडला! सापडला! सापडला! बर्‍याच मेहनतीनंतर ‘मास्क’ चा हिंदी अनुवाद सापडला. ‘नासिकामुखसंरक्षक कीटाणुरोधक वायुछानक वस्त्रडोरीयुक्त पट्टिका’. अमिताभ बच्चन यांच्या या पोस्टवर त्यांचे चाहते कॉमेंट करताना दिसत असून काहींनी हे खूपच भयंकर नाव असल्याचं म्हटलं आहे, तर काहींनी हा प्रश्न केबीसीमध्ये विचारला जाऊ शकतो असा अंदाज लावला आहे. अनेकांचं म्हणणं आहे की, हे नाव इतकं किचकट आहे की, लक्षात ठेवणंसुद्धा कठीण आहे.
अमिताभ बच्चन यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर काही काळापूर्वीच त्यांचा ‘गुलाबो सिताबो’ चित्रपट रिलीज झाला आहे. तो अमेझॉन प्राइमवर रिलीज करण्यात आला होता. ज्यात अमिताभ यांच्यासोबत आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत दिसला होता. याशिवाय ते लवकरच ‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमात दिसणार आहेत. यात रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्या मुख्य भूमिका आहेत.