सुशांतचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण करणार मित्र

    दिनांक : 24-Jun-2020
Total Views |
 
 
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या अचानक एक्झिटमुळे त्याचा जिवलग मित्र संदीप सिंह याला मोठा धक्का बसला असून त्या पार्श्वभूमीवर संदीपने सुशांतचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला ‘वंदे भारतम’हा चित्रपट पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. संदीप या चित्रपटातून सुशांतला श्रद्धांजली वाहण्यासाठी दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकणार आहे.
 


SUSHANT SINGH_1 &nbs
 
 
सोशल मीडियाच्या माध्यमातून संदीपने सुशांतच्या या ड्रीम प्रोजेक्टबद्दल सांगितले. या चित्रपटाची निर्मिती सुशांत करणार होता असेही संदीपने सांगितले असून आपण या चित्रपटात काम करु असा शब्दही सुशांतने संदीपला दिला होता, असे तो सांगतो. तू मला आश्वासन दिले होते, ‘आपण बिहारी भाऊ एक दिवस या इंडस्ट्रीवर राज्य करु आणि आपल्यासारख्या स्वप्न पाहणार्‍या तरुणांसाठी आदर्श ठरु तसेच त्यांना मदत करु’, असे संदीपने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.संदीपने पुढे म्हणतो की, माझ्या पहिल्या चित्रपटात काम करशील असा शब्द तू दिला होतास. आपण राज शांडिल्य यांनी लिहिलेल्या या चित्रपटाची एकत्र निर्मिती करणार होतो. माझ्यावर तू दाखवलेला विश्वास मला हवा आहे. ती माझी ताकद होती. आता तू नाही. त्यामुळे मी रस्ता हरवलो आहे पण हा चित्रपट मी तयार करणार असे तुला आश्वासन देतो. करोडो लोकांना प्रेरणा देऊन सर्व काही शक्य आहे असा विश्वास निर्माण करणार्‍या सुशांतला ही श्रद्धांजली असेल असंही संदीपने म्हटले आहे. संदीपने चित्रपटासाठी तयार केलेले पोस्टरही शेअर केले आहे.