अभिनेता राणा दग्गुबातीच्या भावी पत्नीने मास्कसह केले प्री-वेडिंग फोटोशूट...

    दिनांक : 24-Jun-2020
Total Views |
 
 
ब्लॉगबस्टर चित्रपट ‘बाहुबली’मधील भल्लाल देव ही भूमिका साकारून सर्वांच्या कौतुकास पात्र ठरलेला साऊथचा अभिनेता राणा दग्गुबाती लवकरच विवाहबंधनात अडकणार असून मिहीका बजाजसोबत तो लग्नगाठ बांधेल. कोरोना व्हायरसच्या सावटामुळे अनेक कलाकारांनी आपले लग्न पुढे ढकलले आहे. मात्र दग्गुबाती आणि मिहीकाने साध्या पद्धतीने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन लग्न उरकायचेच ठरवले आहे.
 

MIHIKA BAJAJ_1   
 
 
त्यामुळे खबरदारी घेऊन राणाची होणारी पत्नी मिहीकाने आपल्या लेहंग्यावर मॅचिंग मास्क घालून झकास प्री वेडिंग फोटोशूट केलेय.तिचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना देखील प्रचंड आवडल्याने या फोटोंवर लोकांच्या प्रचंड कॉमेंट्स येत आहेत. राणा आणि मिहीका यांचा रोका सोहळ्याचे फोटो समोर आल्यानंतर आता त्यांचे प्री-वेडिंगचे फोटो गाजत आहेत. राणा आणि मिहीका अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. अखेर त्यांनी विवाहाचा निर्णय घेतला.