मुंबईत उभारले देशातील पहिले कोव्हिड केअर आश्रम

    दिनांक : 23-Jun-2020
Total Views |
 
Mumbai Covid Centre_1&nbs
 
 
मुंबई : मुंबईत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून रुग्णांच्या उपचारासाठीमुंबईसह राज्यात कोव्हिड सेंटर उभारण्यात आले आहेत. मुंबईतही पहिले कोव्हिड केअर आश्रम तयार करण्यात आले आहे. ७० खाटांचे हे आश्रम मुंबई पोर्ट ट्रस्टने उभारले आहे. मुंबई पोर्ट ट्रस्ट रुग्णालयच्या परिसरात जवळपास २ एकरात हे आश्रम बांधले आहे.
 
 
औषधांबरोबरच योग साधनेच्या माध्यमातूनही या आश्रमात रुग्णांवर उपचार होत आहेत. योग, ध्यान, प्रवचर, नामस्मरण या उपायांनीही रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोरोना रुग्णांसाठी तयार करण्यात आलेल्या या पहिल्या आश्रमात कोरोना संसर्ग झालेले ५० वर्षांखालील कोरोना रुग्णांवर उपचार केले जातील, असे मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांनी सांगितले. आश्रमात कोरोना रुग्णांना त्यांनी घरून आणलेले कपडे वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. रुग्णांना कोरोनामुक्त करण्यासाठी आश्रमच्या संचालकांनी रुग्णांची दिनचर्या निश्चित केली आहे. रुग्णांना रोज एक तास योग, ९० मिनिटे ध्यान आणि जवळपास अर्धा तास अध्यात्मिक चर्चा करण्यात येणार आहेत.
 
 
रुग्णांना योग्य सुविधा मिळाव्यात यासाठी या आश्रमाचे निर्माण केले आहे. सर्व खोल्यांमध्ये सुर्याचा प्रकाश योग्य येईल, अशी व्यवस्था केली आहे. प्रत्येक रुग्णांसाठी बेड, खुर्ची आणि पंखा याची व्यवस्था केली गेली आहे. योगासनांसाठी विशेष हॉलही तयार केला आहे. व्हिडीओच्या माध्यमातूनही योगा शिकवण्याची व्यवस्था केली आहे. व्हिडिओ आणि ऑनलाइन पद्धतीने रुग्णांसोबत सकारात्मक चर्चा करण्यात येणार आहे.