मुंबईतील शिवसेना भवन सील

    दिनांक : 23-Jun-2020
Total Views |



Shivsena Bhavan_1 &n 
 

मुंबई : शिवसेना भवनात वावर असलेल्या एका ज्येष्ठ शिवसैनिकाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर खबरदारी म्हणून मुंबईतील शिवसेना भवन काही दिवसांसाठी सील करण्यात आले आहे. शिवसेनेतील सूत्रांनी ही माहिती दिली आहे.

 

दादर येथील शिवसेना भवन हे शिवसेना पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय आहे. शिवसेनेशी संलग्न असलेल्या विविध संघटनांची कार्यालये शिवसेना भवनाच्या इमारतीत आहेत. त्यात स्थानीय लोकाधिकार समिती, भारतीय कामगार सेना, ग्राहक संरक्षण कक्ष अन्य संघटनांची कार्यालये आहेत. या संघटनांशी संबंधित अनेक पदाधिकारी रोजच्या रोज येथे येत असतात. शिवसेना भवनात कायमस्वरूपी कर्मचारी वर्गही आहे. त्याशिवाय, शिवसेनेच्या छोट्या-मोठ्या अनेक दैनंदिन बैठकाही येथे होत असतात. त्या निमित्ताने अनेक शिवसैनिकांचा येथे राबता असतो.

 

नियमित शिवसेना भवनात येणारा एक शिवसैनिक पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्या पृष्ठभूमीवर शिवसेना भवनाचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार असून येथील दैनंदिन कामकाज काही दिवस बंद राहणार आहे. राज्यातील शिवसैनिक किंवा पदाधिकाऱ्यांनी पुढील काही दिवस शिवसेना भवनात येऊ नये, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.