अंतरा मेहता : महाराष्ट्राची पहिली महिला फायटर पायलट!

    दिनांक : 23-Jun-2020
Total Views |

ANTAR MEHATA _1 &nbs 
 
 
सर्वत्र कोरोनाचे संकट पसरलेले असताना अनेकांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे तर दुसरीकडे या संकटकाळात आपल्यासमोर नागपुरातून एक चांगली बातमीही आली आहे. महाराष्ट्राला पहिली महिला लढाऊ वैमानिक मिळाल्याची. त्यांचे नाव आहे अंतरा मेहता. नागपूरच्या अंतरा यांची भारतीय हवाई दलात ‘फायटर पायलट अर्थात लढाऊ वैमानिक म्हणून निवड झालीय. या पदावर गेलेल्या त्या महाराष्ट्रातील पहिल्याच महिला आहेत. ‘फ्लाईंग ऑफिसर’ म्हणून निवड झालेल्या या वर्षीच्या तुकडीतील देशातील त्या एकमेव महिला अधिकारी आहेत. त्यांच्या रुपाने महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण माऊंट कार्मेल गर्ल्स स्कूलमध्ये तर अभियांत्रिकीचे शिक्षण रामदेवबाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमधून झाले आहे. त्यानंतर एसएसबीची तयारी करीत त्यांनी हैदराबादच्या डुंडीगल इथल्या एअर फोर्स अकादमीमध्ये प्रवेश घेतला. येथे ‘पिलेटस पीसी-7’, दुसर्‍या टप्प्यात ‘किरण एमके-1’ हे लढाऊ विमान उडविले. मागील आठवड्यात शनिवारी झालेल्या परेडमध्ये त्यांच्यासह 123 प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण झाले असून आता त्यांना बिदर आणि कलाईकोंडा येथे ‘हॉक्स’ही लढाऊ विमाने उडविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
 
 
देशभरातील 10 महिला फायटर पायलटमध्ये त्यांचा समावेश झाला असून नागपूरच्या संरक्षण जनसंपर्क अधिकार्‍यांनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली. या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, ‘रवी आणि पूनम मेहता या दाम्पत्याची मुलगी फ्लाईंग ऑफिसर अंतरा मेहता आता महाराष्ट्राच्या पहिल्या महिला लढाऊ वैमानिक बनल्या आहेत. फायटर स्ट्रीमसाठी निवड झालेल्या अंतरा या आपल्या बॅचमधील एकमेव महिला अधिकारी आहेत, हे विशेष.