भारतीय व्यवसायांवर चिनी हॅकर्सच्या हल्ल्याची शक्यता

    दिनांक : 22-Jun-2020
Total Views |


 - डार्क वेबवरून समोर आली माहिती

 


China Hackers_1 &nbs 
 
 
पुणे : देशातील व्यवसाय आणि माध्यम समूहांवर चिनी हॅकर्स सायबर हल्ला करण्याची शक्यता असल्याचे डार्क वेबवरून समोर आले आहे. चीनमधील हॅकर्स मागील दहा दिवसांपासून भारताला धडा शिकवण्याच्या चर्चा करीत आहेत, अशी माहिती सायबर सुरक्षा क्षेत्रातील सिंगापूर येथे मुख्यालय असलेल्या सीफर्मा या कंपनीने दिली.

 

 सरकारी, कॉर्पोरेट, दूरसंचार, औषध, स्मार्टफोन, बांधकाम उद्योग क्षेत्रातील कंपन्यांना बदनामीकारक प्रचाराच्या माध्यमातून लक्ष्य करण्याचा कट या हॅकर्सने रचला आहे. हे हॅकर्स संवेदनशील माहिती चोरू शकतात, ग्राहकसेवा बंद पाडली जाऊ शकते िंकवा संकेतस्थळ बंद पाडू शकतात, असे या कंपनीने सांगितले.

 
 
जिओ, एअरटेल, एल अॅण्ड टी, अपोलो टायर्स, मायक्रोमॅक्स आणि सिप्ला या कंपन्यांसह संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, माहिती प्रसारण मंत्रालयाच्या संकेतस्थळांवर सायबर हल्ला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 
दोन्ही देशांमध्ये सीमेवर निर्माण झालेल्या तणावाबाबत डार्क वेबवर मागील दहा दिवसांत मोठ्या प्रमाणावर चर्चा केली जात आहे. सुरुवातीला ही केवळ कुजबूज होती. आता मात्र भारतीय संकेतस्थळांचे नाव घेऊन उघडपणे चर्चा होण्याचे प्रमाण वाढले आहे. भारत-चीन दरम्यान तडजोडीचे संकेत दिले जात असल्याचे निदर्शनास येताच भारतातील उद्योग सरकारी संकेतस्थळांचा धोका वाढल्याचे लक्षात आले आहे. उद्योग आणि सरकारने आपल्या संकेतस्थळांच्या सुरक्षेतील कमकुवत दुवे हटवणे आवश्यक झाले आहे, असे सीफर्माचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार रितेश यांनी सांगितले. या चर्चांबाबत भारतीय संगणक आपात्कालीन प्रतिसाद पथकाला (सर्ट-इन) माहिती देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.