मिझोराम पुन्हा भूकंपाने हादरले

    दिनांक : 22-Jun-2020
Total Views |


 
Mizoram_Bhukamp_1 &n
 

नवी दिल्ली : मिझोरामला आज सकाळी पुन्हा भूकंपाचे झटके बसले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर . एवढी होती, अशी भूकंप विज्ञान केंद्राने दिली. मिझोराममध्ये पहाटे .१० मिनिटांनी या भूकंपाचे धक्के जाणवले. राज्याच्या दक्षिण-पश्चिम दिशेकडे असणाऱ्या चंफाई जवळ या भूकंपाचे केंद्र असल्याचे सांगण्यात आले. परंतु या भूकंपाने राज्यात कोणतीही जीवित अथवा मालमत्तेचे नुकसान झालेले नाही. राज्यात १२ तासांपूर्वीच म्हणजे रविवारी (दि. २१ जून) सायंकाळी भूकंपाचे धक्के बसले होते. या भूकंपाची तीव्रता . इतकी होती.

 
 

या भूकंपाबाबत माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिझोरामचे मुख्यमंत्री जोरमथंगा यांच्याशी संवाद साधला. याबाबतचे ट्विट पंतप्रधान नेरेंद्र मोदी यांनी केले असून, त्यामध्ये मोदी म्हणाले, मिझोराममध्ये आलेल्या भूकंपासंदर्भात मी राज्याचे मुख्यमंत्री जोरमथंगा यांच्याशी बोललो आहे. शिवाय संकटाच्या काळात आपणास केंद्र संपूर्ण सहकार्य करेल असे आश्वासनही दिले आहे.

 
 

गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध भागात भूकंपाचे धक्के बसत आहेत. दिल्ली-एनसीआर, झारखंड, कर्नाटक, जम्मू-कश्मीर, गुजरात सहीत अनेक राज्यांमध्ये भूकंप झाले आहेत.