शिवसेनेच्या बिर्ला कॉलेज विभागीय शाखेचे दवाखान्यात रूपांतर

    दिनांक : 21-Jun-2020
Total Views |
 
Shivsena Corona Hospital_
 
कल्याण : शिवसेना शाखांमध्ये दवाखाने सुरू करा या मुख्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनानूसार कल्याणच्या बिर्ला कॉलेज विभागीय शिवसेना शाखेचे दवाखान्यात रूपांतर करण्यात आले आहे. याची माहिती शिवसेनेचे माजी नगरसेवक रवी पाटील यांनी दिली आहे.
 
 
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी गरज पडल्यास ’शाखा तेथे दवाखाना’ सुरू करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार बिर्ला कॉलेज विभागीय शाखेमध्ये दररोज सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत डॉक्टरांची ओपीडी सुरू असते. आयुर्वेद तज्ञ डॉ. वैभव जोशी यांच्यावतीने हा दवाखाना सुरू करण्यात आला असून पहिल्याच दिवशी नागरिकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे रवी पाटील यांनी सांगितले.