सीमा आणि बर्फाळ प्रदेशात योगा करून जवानांनी दाखवून दिली आपली क्षमता

    दिनांक : 21-Jun-2020
Total Views |
 
Soldiers Yoga_1 &nbs
 
नवी दिल्ली : भारतासह जगभरात आज सहावा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. या निमित्ताने सीमेवर जवानांनीही सोशल डिस्टन्सिंग राखून योग आणि प्राणायाम केला आहे. लडाखमध्ये सीमेवर योग दिवस योगासन करून साजरा केला जात आहे. बर्फात इम्युनिटी चांगली राहण्यासाठी जवानांनी योग आणि प्राणायम केले.
 
 
योग ऍट होम योग विथ फॅमिली ही यावेळेची थीम आहे. सीमेवर असणार्‍या जवानांनीही योग दिन उत्साहात साजरा केला.
भारतीय जवान १८ हजार फूट उंच बर्फाळ प्रदेशात, बद्रीनाथ जवळ वसुधर ग्लेशियर येथे १४ हजार फूट उंचीवर जवांनांनी योगा आणि कवायती केल्या.
 
 
भारत-चीन सीमेसह सिक्कीम येथे आयटीबीपीच्या जवानांनी तब्बल १८ हजार ८०० फुट उंचीवर योगासने केली. लोहितपूर येथील ऍनिमल ट्रेनिंग स्कूलमध्ये घोड्यांसोबत योग प्रात्याक्षिक केली. बर्फाळ प्रदेशातही कठीण योगासन करून जवानांनी आपली क्षमता सिद्ध केली असून आरोग्यासाठी योगा हा जगाला मंत्रच दिला.