ब्राम्हणशेवगे येथील राहुल मोरेची तहसीलदारपदी निवड

    दिनांक : 20-Jun-2020
Total Views |
 
 
Rahul More_1  H
 
चाळीसगाव : तालुक्यातील ब्राम्हणशेवगे येथील युवकाने परिस्थितीवर मात करत अथक परिश्रम व प्रयत्नांमुळे गगन भरारी घेत आपले ध्येय साध्य करत आपल्या कुटुंबाचेच नाही तर ब्राम्हणशेवगे गावाचेही नाव उंचावले आहे. राज्यसेवा परिक्षेचा एमपीएसीचा निकाल जाहीर झाला. यात राहूल मोरेने पुर्ण महाराष्ट्रात ११६ रॅक मिळवत यश संपादन केले आहे. आई वडील दोन्ही शेती करतात. वडिलांचे शिक्षण अल्प आहे. आई नववी शिकलेली आहे. राहुलचे प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण ब्राम्हणशेवगे गावात झाले आहे. दहावीला राहुलला ७१ टक्के मार्क होते. बारावी नांदगाव जि. नाशिक येथे विज्ञान शाखेतून केली.