हे विरोधक आहेत की, अंतर्गत शत्रू?

    दिनांक : 20-Jun-2020
Total Views |
 
 
सत्ताधारी पक्षाचे विरोधकच जर देशहित बाजूला ठेवून देशाच्या शत्रूंचा अजेंडा रेटत असतील तर यापेक्षा दुर्दैव तरी कोणते..?
राजकारण करावे, खुशाल करावे. राजकारण तर आधीच इतके गढूळ झालेले आहे की वैचारिक मतभेदांची जागा केव्हाच वैयक्तिक शत्रुत्वाने घेतलेली आहे. मोदींची पत्नी, आई, डिग्री, सूट वगैरेंवर गलिच्छ वैयक्तिक राजकारण केले जाते, त्यावरही कोणाचा आक्षेप नसावा, कारण ही लोकशाही आहे.
 
 
विविध मुद्द्यांवरून मोदींचे पुतळे जाळले जातात, पोस्टरवर काळे फासले जाते त्याचेही स्वागतच आहे. मोदी एक राजकीय प्रतिस्पर्धी नसून तुमचे शत्रू क्रमांक एक आहेत, हेही स्वीकार्य आहे. पण आज केवळ मोदी देशाचे पंतप्रधान आहेत, म्हणून त्यांचे पाय ओढण्यासाठी आपण विदेशी शत्रूंचे हस्तक बनून देशहिताला पायदळी तुडवावे हे कदापि स्वीकार्य नाही. मोदीविरोधातून आपण देशविरोधी तर बनत नाही आहोत ना याचे किमान भान तरी असावे.
 
 
उरी, पुलवामामध्ये झालेले पाकपुरस्कृत दहशतवादी हल्ले असो, की डोकलाम आणि आता लदाखमधील चीनपुरस्कृत घुसखोरी.. देशातल्या तमाम विरोधक, लिब्रांडू आणि पुरोगाम्यांनी एक खास देशविरोधी पॅटर्न राबविला आहे.
 
 
पाकिस्तानने दहशतवादी हल्ला केला किंवा चीनने घुसखोरी केली की ही टुकडे-टुकडे गँग सक्रिय होते. लगेच सर्व रक्षातज्ञ बनून कसलेही पेशन्स न ठेवता, सरकारलाच जाब विचारायला सुरुवात करतात..
मोदीची विदेशनीती फेल..
कुठे आहे ५६ इंचाची छाती.?
मोदी गप्प का.?
मोदी बदला केव्हा घेणार.? वगैरे वगैरे..
बरं हे सर्व बरळताना हे विरोधक कधी चीन किंवा पाकिस्तानविरुद्ध याच्या ५० टक्के तरी बोलताना दिसतात का..?
तर याचे उत्तर आहे, अजिबात नाही..!!
 
सध्या LC वर आपले २० जवान शहीद झाले आहेत. तर विरोधक मोदी सरकारची मजा घेताना दिसत आहेत, ढोल बडवून बोंबा मारत आहेत. यातून एक प्रकारचा आसुरी आनंद या विरोधकांना मिळत आहे.
याउलट आपण चीनचे ४३ सैनिक मारले, हे आपल्या जवानांचे शौर्य ते अजिबात हायलाईट करताना दिसत नाहीत. उलट चिनी वृत्तपत्रांच्या प्रपोगंडावर विश्वास ठेवून इतके सैनिक मेले नाहीत अशीच कोल्हेकुई करतात. तोच खोटारडा चीन जो कोरोना व्हायरसचे सत्य जगापासून लपवतो, त्यावर हे पुरोगामी आपल्या सैन्याच्या अधिकृत वक्तव्यांपेक्षा जास्त विश्वास ठेवतात. ज्यांना महाराष्ट्र सांभाळत येत नाही ते मुंबईचे सामनावीरसुद्धा यात मागे नाहीत.
 
 
तो कॉंग्रेसचा पप्पू आणि त्याची इटालियन मम्मी मोदी सरकारला विचारत आहेत की, चीन विरुद्ध सरकारचा ऍक्शन प्लॅन काय?  LC वर भारतीय सेनेची काय पोझिशन आहे?
 
 
२०१७ ला ऐन डोकलाम विवाद सुरू असताना हेच पप्पू आणि अँटोनिया चिनी दुतावासात डिनर झोडायला का गेले होते? मोदी सरकारकडून संवेदनशील माहिती घेऊन ती यांना चीनला तर द्यायची नाही ना.. याचा जाब त्यांचे चमचेच त्यांना का विचारत नाहीत.?
 
 
काही पुरोगामी विचारजंत तर उगाच संघाला मधात ओढत आहेत. ज्या संघाची हे टर उडवतात, त्या संघाचे स्वयंसेवक वेळ पडल्यास फ्रंटीयरवर जातीलही. पण त्यावेळी या विचारजंतांचे देशासाठी काय योगदान असेल, याचा त्यांनीच विचार करावा.डोकलाममध्ये तब्बल ७३ दिवसानंतरसुद्धा भारताने एक इंचही जागा सोडली नव्हती. सरकारने एकही प्रक्षोभक विधान न करता सर्व काही शांततेने परिस्थिती सांभाळली होती. शेवटी चीनलाच माघार घ्यावी लागली होती. पण यंदा मोदींनी मौन पाळले नाही.
 
 
आज मोदींनी लाईव्ह येऊन चीनला थेट सज्जड इशारा दिला. तरीही ही पिलावळ म्हणते की मोदींनी चीनचे नाव का घेतले नाही? दोन दिवस उशीर का केला? असले फालतू प्रश्न ते करत आहेत? उरी आणि पुलवामाची टाइमलाईन या विरोधकांनी जरा बघावी..
 
 
जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असा इशारा मोदींनी जेव्हा जेव्हा दिला आहे, तेव्हा तेव्हा शहीद जवानांच्या तेरवीच्या अगोदरच मोदींनी आणि आपल्या भारतीय सेनेने त्यांच्या हौताम्याचा बदला शत्रूच्या घरात घुसून घेतलेला आहे. मोदींनी आणि भारतीय सेनेने यंदा बदला जरी घेतला, तरी अचानक ही ‘सबूत गँग’ सक्रिय होणार आहे. सर्जिकल स्ट्राईक आणि एयर स्ट्राईकचे जसे पुरावे मागितल्या गेले तसेच याचेसुद्धा निर्लज्जपणे पुरावे मागितले जातील. याचे श्रेय सुद्धा ते मोदींना देणार नाहीत. हे केवळ विरोधक नसून चायनीज PL चे देशांतर्गत सैनिक आहेत. देशातले मोदी विरोधक चीन-पाकिस्तानची बी-टीम असल्यासारखे का वागतात? का लिब्रांडू शत्रूंचाच नॅरेटिव्ह रेटून धरतात? यांना कम्युनिस्ट चीनने विकत तर घेतले नाही ना अशी शंका उपस्थित व्हावी असे हे पुरोगामी का वागतात.?
 
 
यामागे कारण हे आहे की, या गिधाडांना मोदी सरकारवर टीका करण्याची एक आयती संधी दिसत आहे. आपले राजकीय इप्सित साध्य करण्यासाठी विरोधक नुसते ब्राऊनी पॉईंट्स स्कोर करण्याच्या मागे लागले आहेत. कॉंग्रेसचे हे पाळीव श्वान तर २००२ पासून मोदींची विच हंट करत आहेत. २०१४ मध्ये भारतीय राजकारणात जी क्रांती झाली त्याचे अपयश त्यांना तर अजूनही पचवता येत नाहीये. मोदीविरोधातून आपण देशविरोधाकडे जात आहोत इतकेही त्यांना भान राहिलेले नाही.
 
 
९/११ च्या हल्ल्यानंतर अमेरिका सुद्धा एकजूट झाला होता. पॅरिस हल्ल्यानंतर तर फ्रांसच्या सर्व सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येऊन रात्रभर संसद सुरू ठेऊन ७२ दहशतवाद विरोधी कायदे पारित केले होते. कोरोना पार्श्वभूमीवर अमेरिकेत डेमोक्रॅट्स आणि रिपब्लिकन्ससुद्धा चीनविरुद्ध एकमत झालेत. इस्राईल, जपान तर जाऊद्या आपण इवलासा तैवान चीनच्या डोळ्यात डोळे घालून बघू शकतो, कारण तो एकजूट आहे. फक्त भारतातच असे कधीही होताना दिसत नाही. ङAउवर चीनविरुद्ध झालेल्या चकमकीत आपले २० वीर सुपुत्र शहीद होणे म्हणजे हे एक राष्ट्रीय संकट आहे. अशा संकटसमयी सत्ताधारी व विरोधकांनी एकत्र येऊन चीनविरुद्ध किमान देशहितासाठी आवाज बुलंद करण्याची गरज असताना, केंद्रातल्या मोदी सरकारवर आगपाखड करण्याची दुर्बुद्धी या विरोधकांना कशी काय होते. भारत विरुद्ध चीन हे स्वरूप असताना मोदी विरुद्ध चीन असा नरेटिव्ह हे कसे काय सेट करू शकतात. एकवेळ चीनचा इलाज शक्य आहे पण शत्रूचे प्रवक्ते बनलेल्या या देशविरोधी विरोधकांचा काहीच इलाज नाही.
 
 
पक्षहितापायी देशहित विसरणार्‍या आपल्या देशातील विरोधकांसारखे नीच आणि कपटी विरोधक कदाचित इतर कुठल्याही देशाला लाभले नसतील. चीनसारखा एक परकीय आक्रमक शत्रूसुद्धा आपल्याला एक देश म्हणून एकजूट करू शकत नाही, हीच एक शोकांतिका आहे.
 
 
असो, भारतीय जनमानस आणि आंतरराष्ट्रीय समूदाय मोदींच्या पाठीशी भक्कम उभा आहे. भारतीय सेनेचे मनोबल सुद्धा कधी नव्हते इतक्या उच्च स्तरावर आहे. यावेळी सुद्धा भारत कपटी चिनी ड्रॅगनला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही यात काहीही शंका नसावी. फक्त गरज आहे पंतप्रधान मोदी आणि भारतीय सेना यांचे हात मजबूत करण्याची.
जय हिंद..!!
 
 
- अजिंक्य नगरकर