मोनोरेलसाठीचे चिनी कंपन्यांना दिले जाणारे कंत्राट केले रद्द

    दिनांक : 19-Jun-2020
Total Views |
 
Monorail_1  H x
 
मुंबई : गलवान खोर्‍यातील भारत-चीन संघर्षानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. चीनला अद्दल घडवण्यासाठी भारताने आर्थिक व्यवहारांमध्ये बहिष्कारास्त्र उपसले आहे. यानुसार, मुंबई मेट्रोपॉलिटन रिझन डेव्हलपमेंट अथॉरिटीकडून मुंबईतील मोनोरेलसाठीचे चिनी कंपन्यांना दिले जाणारे कंत्राट रद्द केले आहेत.
 
 
10 मोनोरेलच्या रॅकसाठी दोन चिनी कंपन्यांना दिले जाणारे कंत्राट अंतिम टप्प्यात होते. मात्र, दोन्ही चिनी कंपन्यांचे ते कंत्राट आता रद्द करण्यात आले आहेत. त्या ऐवजी भारत हेवी इलेक्ट्रीकल्स लिमिटेड (BHEL) आणि BEML या भारतीय कंपन्यांना हे कंत्राट देण्याबाबत चर्चा सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.
 
 
दरम्यान, भारत-चीन सीमेवरील हिंसक घडामोडीनंतर सीमारेषेवर चांगलाच तणाव निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.
भारत-चीन सीमेवरील परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी ही सर्वपक्षीय व्हर्च्युअल बैठक आयोजित करण्यात आली आहे. संध्याकाळी पाच वाजता बैठकीला सुरुवात होणार असून या व्हर्च्युअल बैठकीत विविध राजकीय पक्षांचे अध्यक्ष आणि नेते सहभागी
होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.