अभिनेता सौरभ गोखलेची पत्नी आहे उत्तम अभिनेत्री

    दिनांक : 18-Jun-2020
Total Views |
 
अनेक हिंदी सिनेमातून केला अभिनय
 
अनेक मराठी मालिकांमध्ये उत्तम अभिनय करणारा तसेच मराठी चित्रपटामध्ये काम करणारा, नव्याने येणार्‍या ‘सिंबा’ या बॉलीवूड चित्रपटामध्येही सौरभने काम केले आहे. या अभिनेत्याची सर्वात जास्त लोकांना आवडणारी मालिका म्हणजे ‘राधा ही बावरी’. या मालिकेने या अभिनेत्याची ओळख आपल्याला करून दिली.
 

ANUJA SATHE_1   
 
परंतु ‘लाईन व्यस्त आहे’, ‘योध्दा’, ‘तलाव’ आणि ‘भोभो’ हे मराठी चित्रपट तर ‘सिम्बा’ ह्या हिंदी चित्रपटामध्ये त्याने काम केले आहे. अभिनय ही त्याची लहान पणापासूनची आवड होती. त्यामुळे शाळेत असल्यापासून नाटकामध्ये काम करताना त्याने आपले शिक्षणही मन लावून पूर्ण केले. सौरभचे आई-वडील हे दोघेही मुळात डॉक्टरी पेशा असणारे, त्यामुळे अभ्यास करणे हे त्याच्या रक्तातच होते. त्याची पहिली मालिका 2010 मध्ये आली होती. तिचे नाव ‘मांडला दोन घडीचा डाव’. यापासून त्याचा प्रवास सुरू झाला.
 
 
सौरभची बायको अनुजा साठे ही देखील फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करते. तीसुध्दा दिसायला तितकीच सुंदर आहे. तिनेही मालिका आणि चित्रपट या दोन्ही ठिकाणी काम केले आहे. हिंदी मालिकेमध्येही तिने काम केले आहे. ‘पेशवा बाजीराव मस्तानी’ ही तिची पहिली मालिका. त्यानंतर तिला अनेक मालिकांमध्ये काम मिळत गेले. ती एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे हे तिचा अभिनय पाहून खात्री पटते.
 
 
‘अग्निहोत्र’, ‘मांडला दोन घडीचा डाव’, यांसारख्या मराठी मालिकांमध्ये तिने काम केले होते. तिने कॉफी आणि बरेच काही, राखणदार यांसारख्या मराठी चित्रपटातदेखील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
 
 
‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटामध्येही ती पाहायला मिळाली. ‘परमाणु द स्टोरी ऑफ पोखरण’ या चित्रपटामध्येही ती जॉन अब्राहम सोबत मुख्य भूमिकेत दिसली होती. सध्या एम एक्स प्लेअरवरील ‘एक थी बेगम’ चित्रपटातील तिचे काम लोकांना खूप आवडते आहे.