असा बनवा स्पेशल मटर पुलाव

    दिनांक : 18-Jun-2020
Total Views |
 
 
जितकी नॉनव्हेजप्रेमींसाठी बिर्याणी प्रिय असते, तितकाच शाकाहारी मंडळींसाठी पुलाव प्रिय असतो...त्यातही पनीर पुलाव, मटर पुलाव असेल तर पुलाव प्रेमींसाठी तो एक अनोखा आणि भन्नाट माहोल असतो. आज आम्ही स्पेशल मटर पुलाव घेऊन आलोय... जो खाल्ल्यावर तुम्ही पण म्हणाल, वाह क्या बात है....चला तर मग ट्राय करूया..\
 
 

MATER PURAV_1   
 
साहित्य : दोन कप बासमती तांदूळ, दीड कप हिरवे ताजे मटार, 20 किसमिस, 12 काजू तुकडे, मीठ चवीनुसार.
पुलावसाठी मसाला : 4 लवंगा, 2 हिरवे वेलदोडे, छोटा दालचिनीचा तुकडा 1 छोटा चमचा खसखस.
फोडणीसाठी : एक टेबल स्पून तूप, 1 टीस्पून शहाजिरे, 6-7 मिरे, 2 तमल पत्र, 1 मध्यम कांदा (चिरून).
 
 
कृती :
 तांदूळ धुऊन धुवून घ्या.(नंतर तासभर बाजूला ठेवा), मिरे, वेलदोडे, दालचिनी बारीक वाटून घ्या., कुकरमध्ये तूप गरम करून त्यामध्ये शहाजिरे, मिरे, दालचिनी, तमालपत्र, कांदा, मटार घाला. मग 1 मिनिटभर परतून घ्या., आता त्यात तांदूळ घाला आणि पुन्हा 2-3 मिनिटे परतून घ्या., परतून झाला की बारीक केलेला गरम मसाला, खसखस, धने-जिरे पावडर, मीठ घालून मिक्स करून 4 कप गरम पाणी घालून पुन्हा मिक्स करून कुकरचे झाकण लावून दोन शिट्या होऊ द्या., कुकर थंड झाल्यावर झाकण काढून गरमागरम मटर पुलाव सर्व्ह करा. मटर पुलाव सर्व्ह करतांना वर खोबरे व कोथिंबीर घालावी.
झाला तुमचा स्पेशल मटर पुलाव....