प्रशांत महाजन यांना पीएच.डी. प्रदान

    दिनांक : 17-Jun-2020
Total Views |
 
‘खान्देशातील तंत्रशिक्षणाची संख्यात्मक वाढ, गुणात्मक विकास’यावर संशोधन
 

SHIRPUR_Prashant Mahajan_ 
 
शिरपूर : विपणनशास्त्र, रणनीती व मूल्यांकित सेवा या आधारे, खान्देशातील अभियांत्रिकी व तंत्रशिक्षणातील संख्यात्मक वाढ व गुणात्मक विकास कशी होवू शकते. या विषयासंबंधी संशोधन सादर करून येथील आर.सी.पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, शिरपूर या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कुलसचिव प्रशांत तुकाराम महाजन यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून व्यवस्थापन विद्याशाखेंतर्गत पी.एचडी. पदवी प्राप्त करीत यश संपादन केले आहे.
 
 
येथील आर.सी.पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कुलसचिव प्रशांत महाजन यांनी एस.पी.डी.एम.महाविद्यालयातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ.एस. बी. गोलाहीत यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ टेक्निकल एज्युकेशन इन खान्देश रिजन विथ स्ट्रेटेजिक मार्केटिंग अँड वॅल्यू बेस्ड सर्विसेस’ या विषयावर संशोधन केले. यादरम्यान त्यांनी खान्देशातील धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील सुमारे ३००० भावी, आजी व माजी विद्यार्थ्यांची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व कौटुंबिक पार्श्वभूमी तपासली करुन या विद्यार्थ्यांच्या मते खान्देशातील अभियांत्रिकी व तंत्रशिक्षण महाविद्यालयांनी गुणवत्तेवर आधारित पुरविलेल्या सोईसुविधा, अध्यापनपद्धती, कॅम्पस प्लेसमेंट, गुणवत्ता, कौशल्य व व्यक्तिमत्व विकास याबाबत राबविले जाणारे उपक्रम यासह विविध विषयांचा पाठपुरावा घेतला. या सांखिकी माहितीच्या विश्लेषणावरून डॉ. महाजन यांनी खान्देशातील अभियांत्रिकी व तंत्रशिक्षणा क्षेत्राच्या वाढीचा व विकासाचा आढावा आपल्या संशोधान प्रबांधात मांडला.
 
 
डॉ.महाजन यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित व दर्जेदार जर्नल्समध्ये १५ हून अधिक शोध निबंध प्रसिध्द झालेले असून राष्ट्रीय व राज्य स्तरावरील ७ संशोधन चर्चासत्र व कार्यशाळांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे. ते एस.पी.डी.एम. महाविद्यालयातील वरिष्ठ व सेवानिवृत्त प्राध्यापक, माजी अधिष्ठाता उमवि, जळगाव व चोपडा येथील पंकज महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.टी.टी.महाजन यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या या यशाबद्दल शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ.अमरीश पटेल, कार्याध्यक्ष भूपेश पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, संचालक तपन पटेल, माजी कुलगुरू प्राचार्य डॉ. के.बी. पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.बी.पाटील, उपप्राचार्य डॉ. प्रमोद देवरे, विभागप्रमुख प्रा. सुहास शुक्ल, प्रा.डॉ.नितीन पाटील, प्रा.प्रवीण सरोदे, प्रा.विजय पाटील, प्रा.तपकीरे यांनी अभिनंदन करून समाधान व्यक्त केले आहे.