राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीतर्फे वादळी पावसातील नुकसानग्रस्तांना मदतीचा हात

    दिनांक : 16-Jun-2020
Total Views |
 
 
Shahada Jankalyan_1 
 
शहादा : वादळी पावसाने शहादा व तळोदा तालुक्यात १२ रोजी नुकसान झाले आहे. त्यामुळे सोनवल, तर्‍हाडी परिसरातील शेकडो कुटुंब उघड्यावर आले. परिसरातील बहुतेक विद्युत खांब पडल्याने वीज खंडित झालेली आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्यावतीने सोनवल ता.शहादा येथे क्षतिग्रस्त १०० कुटुंबांना तातडीने निवारा होण्याच्या दृष्टीने ताडपत्री कागद, केरोसीन दिवे आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी संघाचे जिल्हा संघचालक विजयराव मराठे, तळोदा तालुका संघचालक अंबालाल पटेल, शहादा तालुका संघचालक डॉ.हेमंत सोनी, समितीचे ज्येष्ठ सदस्य अजय शर्मा, समितीचे कृषी आयाम प्रमुख दशरथ पटेल, संघाचे जिल्हा कार्यकर्ते संजयराव कासोदेकर, भटू शिंपी, रुपेश सोनार, गौरव चौधरी, गौरव जोशी, गणेश धाकड ,बबलू परदेशी, पियुष जोशी, मिनानाथ सोनार, अक्षय संगपाल, चक्षु पाटील, बोरद येथील प्रतीक यांच्यासह अनेक स्वयंसेवक उपस्थित होते.