रा. स्व. संघाच्या माध्यमातून गोवंडी येथे स्क्रीनिंग मोहीम

    दिनांक : 16-Jun-2020
Total Views |

RSS_Screening Cap_1 
 
 
मुंबई :  सध्या संपूर्ण जग कोरोनाशी लढत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही लॉकडाउनच्या काळात विविध स्वरूपाचे मदतकार्य सुरु आहे. मुंबईसह पुणे, ठाणे, नवी मुंबई अशा अनेक ठिकाणी संघाच्या माध्यमातून नागरिकांचे स्क्रीनिंग करण्यात आले. रा. स्व. संघ घाटकोपर विभागाच्यावतीने (पूर्व आणि ईशान्य मुंबई) १४ रोजी गोवंडी येथे स्क्रीनिंगची मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेंतर्गत २०० कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ४६०७ व्यक्तींचे स्क्रीनिंग करण्यात आले.
 
 
गोवंडी येथील शिवाजी नगर परिसर हा कोरोनाचा हॉट स्पॉट आहे. या भागातील कोरोनची लक्षणे आढळणार्‍या व्यक्तींना ओळखले तर वेळीच पावले उचलून या विषाणूचा प्रसार थांबविता येईल. या भूमिकेतून ४० प्रमुख कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली काही डॉक्टर्स आणि १६० कार्यकर्त्यांचे समूह तयार करण्यात आले. या समूहांनी केलेल्या स्क्रीनिंगच्या अहवालावर आता डॉक्टर्स काम करत असून यातून सर्वाधिक लक्षणे आणि धोका असणारे रुग्ण शोधून त्याची माहिती महानगरपालिकेच्या एम वॉर्डला (पूर्व) देण्यात येईल. संघाच्या माध्यमातून अन्न पाकिटे-धान्य पाकिटे वाटप, स्थानिक दवाखान्यात पीपीई कीट वितरण अशी अनेक मदत कार्ये सुरू आहेत.