तळोदा तालुक्यात वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची खा.डॉ.हिना गावीत यांच्याद्वारे पाहणी

    दिनांक : 16-Jun-2020
Total Views |
 
 
Heena Gavit Visit_1 
 
नंदुरबार : नंदुरबार मतदारसंघाच्या खा. डॉ. हिना गावित यांनी तळोदा तालुक्यातील मोड, बोरद , खरवळ आदी गावाना भेटी देऊन पाहणी केली. यावेळी केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे शेतकर्‍यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. मोड, बोरद या गावात सर्वाधिक घरांची पडझड झाली आहे. अनेकांचे घर संसार उघड्यावर आली आहेत. त्यांच्यासमवेत गटविकास अधिकारी तहसीलदार विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी ग्रामसेवक तलाठी आणि नुकसानग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जि.प. सदस्य पंचायत समितीचे सदस्य उपस्थित होते.
तळोदा तालुक्यात तीन दिवसांपूर्वी वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला. या पावसाचा फटका तालुक्यातील बोरद, मोड, खरवड आदी गावांना बसला आहे. काही घरांची पडझड झाल्याने अनेकांच्या संसार उघड्यावर पडला आहे. तसेच शेतांमध्ये पाणी शिरल्याने पिकांचेही नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागात खा. डॉ.हिना गावित यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी तहसीलदार पंकज लोखंडे, नायब तहसीलदार लोमटे, गटविकास अधिकारी सावित्री खर्डे, विद्युत वितरणचे उपकार्यकारी अभियंता सचिन काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता नितीन वसावे, मोडचे तलाठी धनगर, ग्रामविस्तार अधिकारी राजू जाधव, ग्रामविस्तार अधिकारी एस.एस.बावा, कृषी अधिकारी नरेंद्र महाले, अमोल भारती, भरत पावरा, नंदू गोसावी, जितेंद्र पाडवी उपस्थित होते. परिसरातील शेतकर्‍यांनी खा.डॉ. हिना गावित यांच्याकडे नुकसानीची व्यथा मांडली. यावेळी खा. डॉ. हिना गावित यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना दिल्या.