बॉलिवूडचा ‘तारा’ निखळला, सुशांतसिंह राजपूतला चाहत्यांची श्रद्धांजली...

    दिनांक : 15-Jun-2020
Total Views |
 
ट्विटरच्या माध्यामून दिली श्रध्दांजली
 
मुंबई : चार दिवसांपूर्वीच बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सलियानने मुंबईतील एका इमारतीच्या 12 व्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली होती. त्यानंतर 14 जून सुशांतनेही राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे . 34 वर्षांच्या सुशांत फार कमी वेळात त्याने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. छोटा पडदा ते चित्रपट हा सुशांतचा प्रवास अविश्वनिय होता. दिशा आपल्या होणार्‍या नवर्‍यासोबत मालाडच्या एका 14 मजली इमारतीमध्ये राहत होती. तिने आत्महत्या केल्यानंतर पोलिसांनी सुशांत सिंहला याबाबत विचारले असता सुशांतही मानसिक तणावाखाली होता, असं पोलिसांनी सांगितले होते. ही खूप वाईट बातमी आहे. दिशाच्या कुटुंब आणि मित्रांच्या दु:खात मी सहभागी आहे तिच्या आत्माला शांती मिळो’, अशी पोस्ट सुशांतने इन्स्टाग्रामवर केली होती. दिशाने इमारतीवरुन उडी घेत आत्महत्या केल्यानंतर तिला बोरिवलीच्या रुग्णालयात नेले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. तिने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
 

SUSHANT SINGH _1 &nb 
  
सुशांत सिंह हा मूळचा बिहारचा असून काही दिवसांपूर्वी तो आपल्या वडिलोपार्जित घरीही आला होता. तो मूळचा पूर्णियामधील बधारा कोठी येथील मालडीहाचा रहिवासी होता आणि शेवटच्या वेळी जेव्हा त्याने आपल्या गावाला भेट दिली तेव्हा त्याने कौटुंबिक कार्यक्रमातही भाग घेतला होता. सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येच्या घटनेबद्दल अजूनही बिहारच्या लोकांना विश्वास वाटत नाही. खरं तर, शेवटच्या वेळी जेव्हा तो बिहारला आला तेव्हा ते त्याच्या वडिलांच्या गावातील नागरिकांशी खूप मिसळला होता. बिहारच्या या उगवत्या स्टारने होली रिलेशनशिप या मालिकेद्वारे अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. एमएस धोनीसह काय पो चे, शुद्ध देसी रोमान्स, पीके, केदारनाथ आणि त्याचे इतर अनेक चित्रपट हिट झाले आहेत.
 
 
काय पो छे’ या सिनेमातून सुशांतने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. या सिनेमातील त्याच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले होते. या चित्रपटानंतर शुद्ध देसी रोमान्स या सिनेमात तो झळकला. पण बॉलिवूडमध्ये त्याला खरी ओळख दिली ती ‘एम एस धोनी-अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमाने. या सिनेमात त्याने भारताचा माजी क्रिकेट कर्णधार एम. एस. धोनीची भूमिका साकारली होती. त्याने धोनीची भूमिका पडद्यावर अशी काही जिवंत केली की, या सिनेमाने इतिहास रचला. हा सुशांतचा पहिला सुपरडुपर हिट सिनेमा होता. या चित्रपटानंतर ‘केदारनाथ’ या सिनेमात तो सारा अली खानसोबत दिसला होता. सोनचिडीया, छिछोरे या सिनेमातही त्याने काम केले.
 
 
शुद्ध देसी रोमान्स’, ’डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’, ’एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ’केदारनाथ’, ’छिछोरे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत. 2009 मध्ये ’पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तो घरघरांत पोहोचला.
सुशांतची टीमही त्याच्या अकाली मृत्यूने दु:खाच्या महासागरात बुडाली आहे. यातच त्याच्या टीमकडून अधिकृतरित्या एक स्टेटमेंट देत आवाहन करण्यात आलं आहे. ’सुशांत सिंह राजपूत आपल्यात राहिला नसल्याचं सांगताना मोठं दु:ख होत आहे. पण आम्ही आपल्याला आवाहन करतो की, त्याच्या स्मृती कायम तुच्यासोबत राहू द्या. त्याने केलेलं काम आणि त्याचं आयुष्य सेलिब्रेट करा,’ असं आवाहन सुशांतच्या टीमकडून त्याच्या चाहत्यांना करण्यात आलं आहे. सुशांतच्या टीमने माध्यमांना एक विनंती केली आहे. ’या दु:खाच्या क्षणी प्रायव्हसी राखण्यासाठी आम्हाला मदत करा,’ असं टीम सुशांतने आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे.
टीव्ही सीरिअल ते महेंद्रसिंह धोनीचा यशस्वी बायोपिक असा लोकप्रियतेचा कळस गाठणारा प्रवास करणारा हरहुन्नरी कलाकार आत्महत्येसारखे पाऊल उचलतो हे अनाकलनीय आहे असं म्हणत धनंजय मुंडे यांनी सुशांतसिंग राजपूत याला श्रद्धांजली अर्पण केली आहे.
 
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची बातमी ऐकून मला मोठा धक्का बसला. आमची कधी भेट झाली नव्हती, पण त्याने धोनी चित्रपटात खुप सुंदर अभिनय केला होता. जो मी कधीच विसरू शकत नाही. मी त्याला श्रद्धांजली अर्पण करते. ईश्वर त्याच्या आत्म्याला शांती देवो, असं लता मंगेशकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 
 
सुशांतच्या आत्महत्येवर अभिनेता अक्षय कुमारने प्रतिक्रिया दिली आहे. अक्षय कुमारने ट्विट करून सुशांतबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. खरंच या बातमीमुळे मी स्तब्ध आणि अवाक झालोय, असं ट्विट अक्षय कुमारने केलंय.